{"product_id":"कंदीलक्लब-आठवणींचं-गाठोडं","title":"कंदीलक्लब आठवणींचं गाठोडं (KandilClub ... Athavaninch Gathod0","description":"\u003cp\u003eचंद्रकांत (चंदा) भंडारी… शिक्षणासह साहित्यक्षेत्रात रमणारा माझा बाल\/वर्गमित्र. गेल्या पन्नास \/ पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही ‘एकत्र’ आहोत, जरी आमची नोकरी वेगळी असली तरी ! असो. तर चंद्रकांतने ‘कंदीलक्लब’ (आठवणींचं गाठोडं) ही कादंबरी ‘सस्नेह भेट’ म्हणत, जो मान मला दिला तो खरंच आनंद देणारा आहे.\u003cbr\u003eकादंबरी पूर्ण वाचून झाली अन् मित्राच्या लेखनाची ‘धार’ कळली. नायक सूर्यकांतमध्ये मी खूपदा चंद्रकांत शोधत राहिलो अन् एकदोन कॅरेक्टरमध्ये स्वत:सह माझी आई.\u003cbr\u003eखरं सांगू जिथे जिथे ‘आई’ समोर आली तिथे तिथे माझे डोळे भरून आले. अन् चंद्रकांतने तिच्या बद्दल जे जे टिपलं ते ते वाचून मन थक्क झाले.\u003cbr\u003eआमचं अन् ‘कंदीलक्लब’मधील अनेक भिडूंचे शालेय अन् नंतरचे भावविश्व, ज्या घटना प्रसंगांमध्ये टिपलेय ते वाचताना मी सारखा भूतकाळात जात एक वेगळाच आनंद उपभोगत होतो.\u003cbr\u003eहिंदी सिनेमा, किशोर-मुकेश-रफीची गाणी, मनाचे श्लोक, कबीरवाणी आणि एकूणच विविध खेळ यांच्यावरचं ‘प्रेम’ चंद्रकांतने खूपच छान रंगवलेय. सर्वात आवडलं ते कुंदाचं कॅरेक्टर.. जे वाचताना मी रंगून गेलो. तिची ‘डायरी’ तर भन्नाटच, तिचं अन् सूर्यकांतचं नातं तर फारच तरल !\u003cbr\u003e‘कंदीलक्लब’ मधील अनिल, कुंदा, युसुफ, इम्रान, श्रुती, जगन्नाथ या सर्व भिडूंबद्दल मी काय सांगावं? वाचकांनी मनापासून वाचत त्यांचं ‘विश्व’ अनुभवावं. कादंबरीत ‘साने गुरुजी’ ज्या शब्दांमध्ये मला भेटले तेव्हा गुरुजींचे (व एकूणच सर्व शिक्षकांचे) कार्य डोळ्यासमोर येत, ‘गुरुजी आमच्या गल्लीतले एक होते’ याचाही अभिमान वाटला.\u003cbr\u003eपन्नासएक वर्षांपूर्वी जे ‘शालेय जीवन’, आम्ही आनंदात अनुभवले ते ‘कंदीलक्लब’ द्वारा पुन्हा शब्दांतून उभे करण्याची छानशी कला चंद्रकांतला जी जमली ती सुरेख, छान !\u003cbr\u003eशुभेच्छांसह…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– अनिल बाबुराव शिंपी (खैरनार)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eनिवृत्त उपविभागीय अभियंता,\u003cbr\u003eपाटबंधारे विभाग, महाराष्ट्र शासन\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460430508261,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kandil-Club_Chandrakant-Bhandari_cnvt-1.jpg?v=1771914649","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%82","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}