{"product_id":"कला-संस्कृतीचे-उपासक-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-kalasanskrutiche-upasak-dr-babasaheb-ambedkar","title":"कला संस्कृतीचे उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Kalasanskrutiche Upasak : Dr. Babasaheb Ambedkar)","description":"\u003cp\u003eमित्रहो, ‘कलासंस्कृतीचे उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही अत्यंत छोटी पुस्तिका वाचक, रसिकांच्या स्वाधीन करताना मला मनस्वी आनंद होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कलासंस्कृतीचे कसे उपासक होते; त्यांचा कलाविषयक दृष्टीकोन जाणून घेण्याच्या हेतूने प्रस्तुत पुस्तिकेचे लेखन केलेले आहे. यापूर्वी कलेच्या संदर्भात फूटकळ स्वरुपात मजकूर वाचनात आलेला होता. त्यावरुन बाबासाहेब हे कलासंस्कृतीचे\u003cbr\u003eनिस्सीम उपासक आणि चाहते असल्याचे लक्षात येते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोककवी, शाहीर व कलावंतांचे भरभरुन कौतुक केलेले दिसते. वस्तुतः भारतात कला आणि संस्कृतीच्या प्रांतात कार्य करणाऱ्या\u003cbr\u003eलोकांकडे जातीय दृष्टीतून बघीतले जाते. विख्यात संशोधक राजा ढाले ‘अस्तित्वाच्या रेषा’ या ग्रंथात बाबासाहेबांचे कोटेशन नमुद करतात की, “भारतात कलेविषयीची पारख ही जातीनिष्ठ असते.” (अस्तित्वाच्या रेषा, पृ.172) वरील विधानावरुन असे लक्षात येते की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कलाक्षेत्राकडे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून बघतात. कलेकडे बघण्याची त्यांची भूमिका जगावेगळी असल्याचे प्रत्ययास येते. त्यातूनच त्यांना भारतात उच्च जाती व वर्णाच्या कलेला प्रतिष्ठा असलेली दिसते. आणि कनिष्ठ जातीच्या कलाप्रकारांकडे मात्र कुत्सित नजरेने पाहिले जाते, असा ते निष्कर्ष काढतात. उदा. ‘तमाशा’ कलेचे देता येईल. ‘तमाशा’ या कलेकडे वाईट नजरेने बघतल्या जात असल्यामुळे पुढे कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्याला लोकनाटय संबोधलेले आहे. डॉ.बाबासाहेब तर अनेक कलांमध्ये निपुण होण्याची मनिषा बाळगून होते, पण सामाजिक चळवळीतील कार्यबाहुल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. तरी त्यांनी अनेक कलावंतांना आणि कलेला औदार्य भावनेने आश्रय दिलेला दिसतो. आपल्या या कलेच्या प्रेमापोटी त्यांनी अनेक कला आत्मसात केलेल्या दिसतात. त्याचा वेध इथे संक्षेपाने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं पाहिलं तर विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यासंबंधी विविध पैलूंवर आज भरभरुन लिहिले जात आहे. मात्र बाबासाहेबांच्या कलासंस्कृतीच्या पैलूंविषयी कुठं फारसं लेखन झालेलं माझ्या वाचनात नव्हतं. इतर चरित्रात्मक ग्रंथातही कलासक्त बाबासाहेबांविषयी खूपच त्रोटक माहिती वाचनात आली. ती एकत्रीत\u003cbr\u003eगुंफण्यासाठी प्रस्तुत विषयाला हात घातला. तेव्हा प्रथम मला हा विषय रोचक वाटला. तो साकारतानाही खूप वेगळी अनुभूती आली. एक प्रकारची बौद्धिक मज्जा देखील हे सगळे पैलू धुंडाळताना येत होती. बाबासाहेबांच्या अलक्षित पैलूंचा शोध घेताना मला अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींची माहिती ज्ञात झाली, त्यातूनच ही पुस्तिका साकारली आहे.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48760212521189,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KalaSanskruticheUpasakDrBabasahebAmbedkar_DrAshokIngale-1.jpg?v=1775631087","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-kalasanskrutiche-upasak-dr-babasaheb-ambedkar","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}