{"product_id":"कृती-संशोधन-1","title":"कृती संशोधन","description":"\u003cp\u003eसंशोधन मानव समाजाला विकासाच्या दिशेने घेवून जाणारे महत्वपूर्ण आणि सशक्त साधन आहे. उपयोगी संशोधन जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मानवाची प्रगती घडवते. कृती संशोधन म्हणजे आपल्या समस्या शास्त्रीय पद्धतीने स्वतः सोडविण्याची प्रक्रिया आहे. या संशोधनातून मिळालेल निष्कर्ष विशिष्ट क्षेत्रापुरतेच उपयुक्त ठरतात. कृती संशोधन हे शिक्षण प्रक्रियेचे सक्रीय व अविभाज्य अंग आहे. शिक्षण क्षेत्राची विविध अंगे आणि त्यांच्याशी संबंधित घटक हे कृती संशोधनाचे योग्य क्षेत्रे आहेत. कृती संशोधनाद्वारा काही अंतिम निष्कर्ष मिळाले म्हणजे संशोधन झाले असे होत नाही. कृती संशोधनातून मिळणार्या निष्कर्षांना पडताळून पाहिल्याशिवाय त्यांना पूर्णपणे विश्वसनीय आणि प्रमाण मानले जावू शकत नाही. यासाठी निष्कर्षांचे मूल्यमापन होणे गरजेचे असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतात अस्तित्वात असलेल्या विशेष परिस्थिती आणि मर्यादेबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशनाच्या क्षेत्रात संशोधनाची गरज आहे. आपल्या विशेष गरजा, परिस्थिती आणि संस्कृतीच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि समुपदेशन पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन व समुपदेशन करणे, त्याची परिणामकारकता अभ्यासणे कृती संशोधनाद्वारे होवू शकते. शिक्षणाच्या संख्यात्मक सुधारणेसाठी शिक्षणाचे उद्दिष्ट आणि ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम आणि कार्यक्रम संदर्भात संशोधन करणे आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477734764773,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kruti-Sanshodhan_cnvt-1.jpg?v=1772187610","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}