{"product_id":"कोण-म्हणतं-टक्का-दिला-नाट्य-आणि-समाजवास्तव","title":"कोण म्हणतं टक्का दिला ? नाट्य आणि समाजवास्तव","description":"\u003cp\u003eनाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाचा एक प्रकार आहे. नाटक वाचून त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. नाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाच्या प्रक्रियेमुळे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा ठरतो. सादरीकरण हेच नाटकाचे अन्यन्य साधारण वैशिष्ट्ये आहे. आजच्या समस्या, प्रश्न, पारंपारिक नतदृष्ट मूल्यांविरूध्द आधुनिक मूल्यांचा संघर्ष हे विषय प्रामुख्याने हाताळले आहेत.\u003cbr\u003eएकांकिका, नाटक या माध्यमातून त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांचे नाट्यलेखन केवळ मनोरंजनाच्या पातळीवर नसून चळवळीचं, प्रबोधनाचं एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे आपल्या नाटकातून समाजवास्तवाचा विविध अंगानी वेध घेणे संजय पवार यांनी सर्वाधिक महत्त्वाचे मानले आहे असे लक्षात येते. त्यांच्यावर फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने क्रांतीकारी विचारांचे अधिष्ठान नाट्यलेखनात आहे. माणसाला माणूस म्हणून जगायला मिळावं, म्हणून तशी समाजरचना निर्माण झाली पाहिजे हा विचार प्रत्ययकारीपणे त्यांच्या नाटकातून होतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401942642917,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kon-Mhanta-Takka-Dila_-Dr.Manik-bagle-1-768x1161.jpg?v=1770899715","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a4%82-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}