{"product_id":"खानदेश-लोकसभा-प्रतिनिधी","title":"खानदेश लोकसभा प्रतिनिधी","description":"\u003cp\u003eखानदेश हा विभाग पूरातन काळापासून आपले एक आगळे वेगळे अस्तित्त्व\u003cbr\u003eटिकवून आहे. आरंभापासुनच देशाच्या जडण घडणीत या विभागाने मोलाचे योगदान\u003cbr\u003eदिलेले आहे. असे असले तरी कोणत्याही अंगावर लिखाण न झाल्याने हा विभाग\u003cbr\u003eअलिकडच्या काळापर्यंत विशेष नावारूपाला आलेला नव्हता. काही वर्षापासून\u003cbr\u003eयेथिल लोखकांनी खानदेशाच्या विविध विषयांना अनुसरून लेखन सुरू केल्यामुळे\u003cbr\u003eयेथिल विविध पैलू उजेडात येत आहेत. राजकीय योगदानाचा विचार केल्यास\u003cbr\u003eब्रिटीश काळापर्यंत अनेक राजवटी येथे स्थिरावल्या आणि विविध ठसा उमटवून\u003cbr\u003eगेल्या. ब्रिटीशांविरोधी स्वातंत्र्य आंदोलनातही खानदेश अग्रेसर होता. राष्ट्रीय काँग्रेसचे\u003cbr\u003eग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन भरविण्याचा मान फैजपूरने मिळविला. तर साने\u003cbr\u003eगुरूजी, धनाजी नाना, डॉ. उत्तमराव पाटील, सौ. लिलाताई यासारख्या स्वांतत्र्य\u003cbr\u003eसैनिकांनी खानदेश पेटता ठेवला.\u003cbr\u003eस्वातंत्र्यानंतरही देश पातळीवरील खानदेशाच्या योगदानात सातत्य टिकून\u003cbr\u003eआहे. येथील लोक नेत्यांनी केंद्र सरकारच्या तसेच विधीमंडळाच्या विविध कामकाजात\u003cbr\u003eसक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रीय विकासात मोलाची भर घालण्यास हातभार लावला\u003cbr\u003eआहे. मात्र त्यांच्या कार्यावर अद्याप कोणतेही लिखान न झाल्याने त्यांच्या\u003cbr\u003eकार्यतत्परतेचा त्यांच्या राजकीय सक्रियतेचा विशेष उल्लेख वाचायला किंवा\u003cbr\u003eअभ्यासायला मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय विकासाच्या वाटचालीत खानदेशाचा\u003cbr\u003eसहभाग आहे की नाही? असा अनेकांच्या मनात संभ्र निर्माण होतो. तो संभ्र\u003cbr\u003eकमी व्हावा राजकारणात येणाऱ्या नवागतांना राजकारणाची माहिती मिळावी खानदेश\u003cbr\u003eनेतृत्त्वाच्या राष्ट्रीय योगदानाबद्दल येथील तरूणांना अभिमान वाटावा अशा विविध\u003cbr\u003eउद्देशांनी खानदेशातील लोकप्रतिनिधींनी निभावलेल्या राष्ट्रीय व मतदार संघाविषयीच्या\u003cbr\u003eमहत्त्वाच्या भूमिकांची सविस्तर मांडणी या पुस्तकात करण्याचा हेतु आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474176127205,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandesh-Pratinidhi-1.jpg?v=1772093132","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}