{"product_id":"खान्देशची-लोकसंस्कृती","title":"खान्देशची लोकसंस्कृती (Khandeshchi Loksanskruti)","description":"\u003cp\u003eखानदेशात व बृहन्खानदेशात वेळोवेळी झालेली विविध साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, परिषदा, व्याख्यानमाला इत्यादी मध्ये मी निमंत्रित वक्ता म्हणून शेकडो वेळा अभ्यासोनी प्रकटलो आहे. त्या त्या निमित्ताने मी शेकडो ग्रंथ वाचले. अनेक विद्वानांशी चर्चा केली. डिजिटल माध्यमातून फेरफटका मारला. जिथे जिथे ज्ञान कण गवसतील अशा सर्व प्रज्ञाबेटांवर मुसाफिरी करीत आलो आहे. या सर्व धडपडीतून खानदेश बद्दलचे विविधांगी तपशील साठत गेले. ग्रंथरूप येण्या इतपत सामग्री हाताशी होतीच. तेवढयात काय झाले, नवे शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणात पदवी स्तरावर लागू होऊन त्याच्या पहिल्या वाढदिवसाचे क्षण अवतरले. खानदेशाची लोकसंस्कृती अशा शीर्षकाची अभ्यासपत्रिका पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी भारतीय ज्ञान परंपरा या दृष्टिकोनातून नेमली गेली.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401959092453,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kandesh-Sanskruti_Fula-Bagul-1-768x1163.jpg?v=1770900095","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}