{"product_id":"चर्मकार-समाज-संत-रोहिदास-चर्मोद्योग-विकास-महामंडळ","title":"चर्मकार समाज : संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदारिद्य्र कुटूंबात जन्माला आलेली माणसे दारिद्य्रात जन्मतात व दारिद्य्रातच मरण पावतात असे म्हटले जाते. दारिद्य्रात जीवन जगणार्या माणसाला प्रगती करण्यास आवश्यक त्या साधनांची व संधीची कमतरता असते. त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी परंपरांचा पगडा अधिक असल्यामुळे दारिद्य्रातून बाहेर पडण्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करीत नाही. समाजातील दारिद्य्रात जीवन जगणार्या लोकांना प्रगती करण्यास सधन व प्रस्थापित समाज अडसर ठरतो. शासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे तो समाज दारिद्य्राच्या दुष्टचक्रात अडकतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतात व महाराष्ट्रात विविध जातीसमूह तसेच जमाती समूह दारिद्य्रात जीवन जगतांना आढळतात. महाराष्ट्रात चर्मकार (चांभार) जमात हा असाच एक जातीसमूह आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरीबी\/दारिद्य्रात व मागासलेपणात जीवन जगत आहे. चर्मकार समाजाला चप्पल, बूट दुरूस्त करणे, बूट पॉलीश करणे एवढ्या कामावर उदरनिर्वाह करणे कठीण झाले. स्वत:ची जमीन नसल्याकारणाने शेतीतून मिळणार्या उत्पादन प्राप्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. बँकेकडून मिळणारे कर्ज दुरापास्तच झाले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कल्याणकारी राज्याचा स्विकार करून, समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित स्थापन केले. या महामंडळाद्वारे आर्थिक सहकार्य करून चर्मकार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे विविध प्रयत्न सुरू झाले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474142769381,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Charmakar-Samaj-Sant-Rohidas-Charmodhyog-Vikas-Mahamandal_cnvt-1.jpg?v=1772092264","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}