{"product_id":"चिंतामुक्त-व्हाल-तर-आनंदी-रहाल-चिंता-दहति-जीवनम्-चिता-दहति-निर्जीवम्-nbsp","title":"चिंतामुक्त व्हाल तर आनंदी रहाल (चिंता दहति जीवनम्| चिता दहति निर्जीवम्|)","description":"\u003cp\u003eजीवन सुंदर आहे जर जीवनात सुख, शांती, आनंद आणि समाधान आहे तर. जीवनात शांती स्थापित करण्यासाठी म्हणजे आनंदी राहण्यासाठी माणसाने भीती, चिंता किंवा काळजी यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा. असा प्रयत्न करणारे लोक जगात यशाची सर्वोच्च पातळी गाठू शकतात. यांनाच महापुरुष असे म्हणतात. जीवनातील अनुभूतीतून असे महानुभाव जीवनाला उत्तमपणे समजून घेतात. आनंदी जीवन जगण्याची कला अवगत करून घेतात. असे महापुरुष सुख आणि दुःख सारख्याच पद्धतीने पचवू शकतात आणि सुखदुःख देणाऱ्या तात्कालीक घटनांना ताबडतोब मागे टाकून पुढे निघतात. म्हणून हे एका आयुष्यात अनेक आयुष्यांची कार्ये पूर्ण करू शकतात. माणसाच्या मनात भीती आधी निर्माण होते. भीती ही एक नैसर्गिक आणि मूलभूत भावना आहे, जी आपल्याला धोक्यांपासून वाचवण्यासाठी निर्माण होणारी भावना असते. तर, काळजी ही भीतीतून निर्माण होणारी एक भावना आहे, जी भविष्यातील घटनांबद्दल किंवा होणाऱ्या परिणामांच्या चिंतेने येते. म्हणजे सर्वात आधी भीती निर्माण होते. भीतीमुळे काळजी वाटू लागते आणि काळजीतून चिंता निर्माण होते. सततची भीती, सततची काळजी आणि सततची चिंता मनुष्यात टोकदार नैराश्य निर्माण करते आणि या नैराश्याच्या चक्रव्युहात अडकून ठेवते. त्यामुळे मनुष्य आपल्या जीवनात अपयशी ठरण्याची शक्यता वाढते. सततची भीती, सततची काळजी आणि सततची चिंता यामुळे मनुष्याच्या शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम होतो आणि माणसाला कॅन्सर, हृदयरोग, डायबिटीस, अर्थराइटिस इत्यादींसारखे दुर्धर रोग जडू शकतात. भीती ही एक तात्काळ आणि तीव्र भावना आहे जी धोकादायक किंवा असुरक्षित परिस्थितीत उद्भवते. काळजी ही भीतीपेक्षा जास्त काळ टिकणारी आणि भविष्यातील घटनांशी संबंधित भावना आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला उद्या परीक्षा असेल, तर तुम्हाला काळजी वाटेल की तुम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल किंवा नाही. भीती ही धोक्याला दिलेला तात्काळ प्रतिसाद आहे, तर काळजी ही भविष्यातील धोक्यांवर आणि परिणामांवर विवेकाने मार्ग काढण्यासाठी केलेली उपाययोजना असते. जर तुम्ही उंच इमारतीच्या छतावर असाल, तर तुम्हाला भीती वाटेल कारण तिथे पडण्याचा धोका आहे. आणि जर तुम्हाला त्या उंचीवरुन खाली पडण्याची भीती वाटत असेल, तर तुम्हाला काळजी वाटेल की काहीतरी दुखापत होईल. भीती ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आणि काळजी ही भीतीतून निर्माण होणारी एक भावना आहे. काळजी आणि चिंता यात फरक आहे. काळजीत मनुष्याचा विवेक जागृत असतो आणि तो आपले भविष्यातील कार्य नीट व्हावे यासाठी नियोजन करीत असतो. चिंता हे चक्रव्यूह आहे. चिंतेत मनुष्य गुरफटून गेला तर त्याचा विवेक संपतो आणि त्याला आपले कार्य नीट पार पाडता येत नाही. अकारण भीती व काळजी नको आणि चिंता तर मुळीच नको. चिंतामुक्त होण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी ‘चिंतामुक्त व्हाल तर आनंदी रहाल’ हे पुस्तक निर्माण केलेले आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48760581914853,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Chintamuktvhaltalaanandirahal_L.A.Patil-1.jpg?v=1775651899","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a4%bf-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%8d-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a4%bf-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%ae%e0%a5%8d-nbsp","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}