{"product_id":"छत्रपती-संभाजी-महाराज-इ-स-16-जानेवारी-1681-11-मार्च-1690","title":"छत्रपती  संभाजी महाराज (इ.स.16 जानेवारी 1681-11 मार्च 1689)","description":"\u003cp\u003eशैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने भारत सरकारने इ.स. 2020 पासून नविन शैक्षणिक धोरण (NEP) लागू केलेले आहे. त्याची अं लबजावणी भारतातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून होण्यास प्रारंभ झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठां ध्ये नविन शैक्षणिक धोरणाची अं लबजावणी होऊन पदवी व पदव्युत्तर कला शाखेतील इतिहास विषयाचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात येवून लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठां धील इतिहास विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये ‘मराठ्यांचा इतिहास’ हा पेपर अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेला आहे. त्या विषयाच्या अंतर्गत ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध व छत्रपती संभाजी महाराज’ हा घटक आवर्जून शिकविला जातो. महाराष्ट्रातील कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, या विद्यापिठाने शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून बी.ए. द्वितीय वर्ष इतिहास विषयाचा अभ्यासक्रम पुनर्रचित केलेला असून. ‘मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630 ते 1707)’ हा पेपर लागू केलेला आहे. प्रस्तुत ग्रथांचे लिखाण त्या पेपरच्या अतंर्गत करण्यात आलेले आहे. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध आणि छत्रपती संभाजी महाराजांची कामगिरी विद्यार्थ्यांना अगदी मुद्देसूद आणि सहज, सोप्या भाषेत व विस्तृतपणे माहिती व्हावी म्हणून सदर ग्रंथाच्या लिखाणाचे प्रयोजन केलेले आहे. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ पूत्र होते. इ.स. 1680 ते 1689 अशी त्यांची राजकिय कारकिर्द. म्हणजेच त्यांनी छत्रपती म्हणून एकूण नऊ वर्षे राज्यकारभार केला. या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी अव्दितीय अशी होती. त्यांना आप्तस्वकीय व परकिय अशा दोघांनाही एकाचवेळी तोंड द्यावे लागले होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रत्यक्ष औरंगजेब बादशाहा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत आलेला होता. याशिवाय इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी या परकिय सागरी सत्ताही मराठ्यांचा प्रदेशाला वारंवार त्रास देत होत्या. त्यांचाही बंदोबस्त करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांवर होती. संभाजी महाराजांची राजकीय कारकिर्द सुरु झाली तेव्हा सगळीच परिस्थिती प्रतिकुल होती असे आढळते. तरीही अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले राज्य व संस्कृती टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ह्या स्वराज्य संस्कृती रक्षणार्थच त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. औरंगजेब बादशाहाने त्यांचा क्रूर असा वध केला. पण त्यांच्या वधामुळे सगळा महाराष्ट्र पेटून उठला. आपल्या राजाच्या वधाचा बदला आपण घेतला पाहीजे ही जाणीव \u003cbr\u003eमहाराष्ट्रातील सामान्य जनतेला झाली त्यासाठी सगळे महाराष्ट्रीयन एक झाले. त्यांच्या हौताम्याने स्वांतत्र्ययुद्धाचे होमकुंड प्रज्वलित झाले आणि असंख्य मराठे आपल्या प्राणांची आहूती देण्यास सज्ज झाले. या स्वांतत्र्ययुद्धात औरंगजेबाला शेवटी मृत्यू आला; पण त्याला मराठ्यांचे राज्य जिंकता आले नाही. एवढी उर्मी मराठ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांमुळे निर्माण झाली होती. नऊ वर्षांच्या अल्पकारकिर्दीत केलेल्या कामगिरीचा संक्षिप्त इतिहास विद्यार्थ्यांपुढे आणण्याचा अल्पसा प्रयत्न या ग्रंथाच्या रूपाने करण्यात आलेला आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67603643760869,"sku":"9789377766313","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ChhatrapatiSambhajiMaharaj_Somkunwar-1_bea94061-5323-470a-8d17-54085eccf55b.jpg?v=1790941185","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%87-%e0%a4%b8-16-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-1681-11-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a-1690","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}