{"product_id":"जंगलाचं-देणं-एक-आकलन","title":"जंगलाचं देणं  एक आकलन","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या वाङ्मय प्रकार ललित साहित्य अंतर्गत ‘जंगलाचं देणं’ अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे संपादन करताना आनंद होत आहे. \u003cbr\u003eनिसर्ग आणि मानवी जीवन यांचा अनुबंध तसा युगानुयुगांचा, पण आधुनिकतेच्या प्रवाहात आपण निसर्गापासून दुरावत गेलो. अशा वेळी निसर्गाशी तुटलेला हा धागा पुन्हा जोडण्याचे आणि अरण्यातील गूढ, समृद्ध जग उलगडून दाखवण्याचे अद्भूत कार्य मारुती चित्तमपल्ली यांच्या लेखनाने केले आहे. ‘जंगलाचे देणं’ हे केवळ एक पुस्तक नसून, निसर्गाने मानवी संस्कृतीला दिलेली एक अमूल्य भेट आहे.\u003cbr\u003eया साहित्यावर समीक्षात्मक लेखन करताना निसर्गभ्रमणाचा अनुभव घेता येतो. जंगलातील पशू-पक्षी, झाडे-झुडपे, कीटक आणि वन्यजीवांच्या विश्वाशी एकरूप होऊन त्यांनी मांडलेले निरीक्षण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवत नाही, तर त्यात एक हळवा, संवेदनक्षम साहित्यिकही जाणवतो. त्यांच्या या पुस्तकातून जंगलाची भाषा, तिथली शांतता आणि त्या शांततेतील गूढ नाद समजून घेता आला.\u003cbr\u003eया माध्यमातून चित्तमपल्ली यांच्या निसर्गप्रेमी दृष्टीचा, त्यांच्या समृद्ध शब्दकळांचा आणि जंगलाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. वन्यजीवांचे जीवन त्यांनी ज्या तन्मयतेने टिपली त्याची जाणीव करून होते . परंतु या अभ्यासाने वाचकांचा निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणला. चित्तमपल्लींचे हे लेखन वाचकांमध्ये निसर्गाबद्दल केवळ कुतूहल निर्माण करत नाही, तर एक नैतिक जबाबदारी आणि पर्यावरणाविषयीची जाणीवही निर्माण करते. ‘जंगलाचे देणं’ या साहित्यकृतीचा वेध घेताना निसर्गाप्रती कृतज्ञतेची ही भावना अधिक होते. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52895220596965,"sku":"9789377761677","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Janglachden_Pathak-1.jpg?v=1789643488","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}