{"product_id":"डिजिटल-अर्थव्यवस्था-digital-economy","title":"डिजिटल अर्थव्यवस्था - Digital Economy","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकाची मांडणी विद्यापीठाच्या अद्ययावत अभ्यासक्रमानुसार दोन मुख्य भागांमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात ’डिजिटल अर्थव्यवस्थेची व्याख्या आणि कार्यपद्धती’ यावर सखोल प्रकाश टाकण्यात आला असून, यामध्ये ई-कॉमर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे अर्थशास्त्र, गिग वर्क (हंगामी\/कंत्राटी 4 | प्रशांत पब्लिकेशन्स \u003cbr\u003eकाम) आणि ॲग्रीगेटर्स या आधुनिक घटकांचे विश्लेषण केले आहे. केवळ या अर्थव्यवस्थेची उज्ज्वल बाजू न दाखवता, तिची दुसरी बाजू - म्हणजेच सायबर फसवणूक, अति-पॅकेजिंगचे दुष्परिणाम, घरपोच वितरणाशी (Home Delivery) संबंधित सामाजिक समस्या आणि वेळ-मर्यादित वितरणाचे (Timed Deliveries) होणारे दुष्परिणाम यावरही अत्यंत डोळसपणे आणि चिकित्सकपणे मांडणी करण्यात आली आहे.\u003cbr\u003eदुसऱ्या प्रकरणात ’भारतातील विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा झालेला प्रसार या विषयाचा वेध घेण्यात आला आहे. यामध्ये भारतातील डिजिटल बँकिंग (NEFT, RTGS, UPI, आधार संलग्न पेमेंट), ई-गव्हर्नन्स (डिजी लॉकर, जन धन योजना), वाहतूक क्षेत्रातील फास्टॅग व ऑनलाईन बुकिंग, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ब्लिंक इट, स्विगी, झोमॅटो यांसारख्या ई-कॉमर्स व क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सचा विस्तार, ओटीटी प्लॅटफॉर्म्स (नेटफ्लिक्स, जिओ, हॉटस्टार), सोशल मीडिया, ऑनलाईन शिक्षण, ई-आरोग्य सेवा आणि ऑनलाईन ट्रेडिंग व गुंतवणुकीच्या आधुनिक प्रवाहांना सामावून घेण्यात आले आहे. हे पुस्तक केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेले नसून, ते विद्यार्थ्यांमध्ये ’डिजिटल साक्षरता’ आणि ‘आर्थिक भान’ निर्माण करण्यासाठी एक दिशादर्शक मार्गदर्शक ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52904945647845,"sku":"9789377760809","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/DigitalArthvyavstha_Ghotekar-1.jpg?v=1789805314","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-digital-economy","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}