{"product_id":"तथाकथित-देव-मरावा-आणि-माणूस-जागावा","title":"तथाकथित देव मरावा आणि माणूस जागावा !","description":"\u003cp\u003eडॉकिन्स एक जीवशास्त्रज्ञ आहेत, आणि ते सांगतात की माणसाची धार्मिक प्रवृत्ती ही उत्क्रांतीचा परिणाम आहे. मुले लहानपणी मोठ्यांचे प्रत्येक बोलणे मानतात. हे त्यांच्या जगण्यासाठी उपयुक्त होते. पण नंतर हीच प्रवृत्ती धर्मावर विश्वास ठेवण्यात वापरली जाते. डॉकिन्स म्हणतात की इतिहासात धर्मामुळे अनेक युद्धं, हत्या आणि असहिष्णुता निर्माण झाली. म्हणून ते धर्माला नैतिकतेचा स्रोत नव्हे, तर संघर्षाचा स्रोत मानतात. धर्म लोकांना जग न समजण्यात (अज्ञानी राहण्यात) समाधान मानायला शिकवतो- आणि त्यामुळे युद्ध व संघर्ष निर्माण होतात. ते सांगतात की नैतिकता ही देवावर अवलंबून नाही. माणसं देवावर विश्वास ठेवत नसली तरीही ती चांगली, नैतिक, संवेदनशील आणि दयाळू राहू शकतात. म्हणून ङ्गदेवाशिवाय जीवनाला अर्थ नाही - हे विधान चुकीचे आहे असे ते म्हणतात. आपण देवाशिवायही चांगले राहू शकतो.\u003cbr\u003eडॉकिन्स यांचा संदेश असा आहे की, सत्याचा शोध विज्ञानाच्या तर्कशुद्ध मार्गाने घ्यावा, आंधळ्या श्रद्धेने नव्हे. त्यांच्या मते, देव ही कल्पना मानवी इतिहासातील एक जुनी मिथक आहे - आता मानवाने त्यापलीकडे जाण्याची वेळ आली आहे. देवाच्या अस्तित्वाबद्दल कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही म्हणून तो \"भ्रम\" आहे. धर्म हा उत्क्रांतीचा मानसिक परिणाम आहे. जैविक कारणांमुळे निर्माण झालेली ती मानसिक प्रवृत्ती आहे. धर्माने हिंसा वाढवली. तो शांततेचा नव्हे तर संघर्षाचा स्रोत ठरला. देवाशिवाय नैतिकता शक्य आहे. चांगुलपणा देवावर अवलंबून नाही. देवावरचा विश्वास म्हणजे भ्रम. कारण तो पुराव्याशिवाय आहे. विज्ञान हे सत्याचं साधन आहे. तर्क आणि संशोधन यावर विश्वास ठेवावा.   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48891408580837,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tathakathitdevmaravaanimanusjagava_L.A.Patil-1.jpg?v=1777027693","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a4%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}