{"product_id":"तहान-स्वरुप-आणि-समीक्षा","title":"तहान स्वरुप आणि समीक्षा","description":"\u003cp\u003eनव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर ग्रामीण जनजीवनाची वाताहत ज्या भयानक रूपात होत आहे, त्याला गेल्या शतकात तरी तोड नाही. अनेक समस्यांनी घायाळ झालेला हा समाज हळूहळू का होईना जागा होत आहे; याच समाजातून आलेले सर्जनशील लेखक नव्या पिढीचे साहित्यिक म्हणून प्रा. सदानंद देशमुख आता सर्वपरिचित झाले आहेत. त्यांनी आपल्या कादंबरीतून ग्रामजीवनाच्या व्यथा-वेदना आणि समस्यांना सशक्तपणे शब्दरूपाने अविष्कृत केले आहे. त्यातलीच ‘तहान’ ही कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘तहान’ ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्वाची साहित्यकृती मानली जाते. ग्रामीण जीवनातील पाण्याच्या महत्वाच्या प्रश्नाला तर ती जिवंतपणे साकार करतेच, पण ही ‘तहान’ केवळ पाण्यापुरती न राहता ती पैसा, भोगलालसा, दोन पिढ्यांतील व दोन संस्कृतीतील मूल्यसंघर्ष अशा अनेक गोष्टींना व्यापून राहते. त्यामुळे या कादंबरीला अनेक प्ररिमाणे प्राप्त होतात. या कादंबरीतील वैशिष्ट्यपूर्ण पात्रे प्रसंग, जिवंत भाषाशैली-अशा अनेक घटकांमुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड तर घेते, शिवाय मूलभूत मानवी प्रश्नांच्या बाबत त्याला विचारप्रवृत्तही करते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474566328549,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tahan_Swarup-Aani-Samiksha_cnvt-1.jpg?v=1772103774","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}