{"product_id":"दक्षिण-आशिया-आणि-भारत-अमेरिका-संबंध","title":"दक्षिण आशिया आणि भारत-अमेरिका संबंध","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय अखंडता, सार्वभौमत्व, नितीमूल्यांचे संरक्षण तसेच बाह्य आक्रमणांचा प्रभावी प्रतिकार, सर्व राष्ट्रांच्या सुरक्षा धोरणाचे मुख्य ध्येय असते. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोव्हिएत संघाचे विघटनामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरण तसेच जगातल्या शक्तीच्या राजकारणावर व्यापक असा प्रभाव पडला. अमेरिकी नेतृत्वात स्थापन झालेली एक ध्रुवीय जागतिक प्रणालीमुळे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक परिवर्तन, अव्यवस्था तसेच असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले. शीतयुद्धाच्या समाप्तीचे फलस्वरूप आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेच्या समोर नविन आव्हाने निर्माण झाली. त्याचबरोबर प्रादेशिक संघर्षांनाही प्रोत्साहन मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामिक कट्टरपंथियांचा उदय तसेच दहशतवादाचे ध्रुवीकरण एका शक्तीकेंद्राच्या रुपाने अमेरिकी प्रभुत्वास आव्हान देताना दिसत आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरणात बदल झाल्याचे दिसते. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला चारवेळा पराभूत केले. 2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून संबंध ताणले गेले तर दुसरीकडे बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंकेबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. सद्य:स्थितीत भारताने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेला तिलांजली दिलेली असून आज भारत महाशक्ती बनण्याकडे वाटचाल करीत असून महाशक्ती अमेरिकेने देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भविष्यात भारत-अमेरिका युती आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात आता शंका राहिलेली नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458284531941,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dakshin-Aashiyache-Aani-Bharat-Amerika-Sambandha_Dr-N-Z-Patil_cnvt-1.jpg?v=1771847083","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}