{"product_id":"देवाचिये-द्वारी","title":"देवाचिये द्वारी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले देवाचे द्वार आणि त्यांच्या हरिपाठाचे निरुपण वरनिर्देशित अर्थात सामावलेले आहेत. कवि प्रतीभारूप काव्यसाधना करत असतांना, आर्त अलौकिक प्रेमाने त्याची आळवणी करत असतांना देवाच्या दाराशी उभा असतो. त्याच इप्सित पूर्ण होण म्हणजे कविच वेिशरूप परमेेशराशी एकरूप होण; त्याच्या अनादिअनंत वेिशात मिसळून जाण होय. मायेच्या पसाऱ्यातून मुक्त होऊन परब्रह्म्याशी तादात्म्य पावण होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453515870437,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Devachiye-Dwari_Chandrashekhar-Kulkarni_cnvt-1.jpg?v=1771658423","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}