{"product_id":"निवडक-दलित-एकांकिका-एक-चिंतन","title":"निवडक दलित एकांकिका : एक चिंतन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदलित रंगभूमीला सशक्त, संपन्न आणि प्रयोगक्षम बनविणारे संवेदनशील नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी संपादित केलेल्या ‘मराठी दलित एकांकिका’ यावरील परिचयात्मक लेखन म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. शाळा, महाविद्यालय, शासन व विविध संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार्या अनेक स्पर्धांमधून ‘एकांकिका’ जनसामान्यांपर्यंत पोहचली. तरुणाईचा तर जिव्हाळ्याचा विषय झाली. ‘एकांकिका’ हा शिकण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वत:ला घडवून घेण्याचा कला प्रकार आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा आग्रह धरीत मराठी दलित एकांकिकांची निर्मिती झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकातील एकांकिकांचा अभ्यास करताना, समीक्षा करताना नाट्य वाङ्मयाच्या सर्व प्रकारच्या आकृतिबंधांना जाणीवपूर्वक महत्त्व दिले, त्याचप्रमाणे विषय आणि तंत्र दृष्ट्याही दिलेले महत्त्व लक्षणीय असेच आहे. समीक्षेच्या अंगाने किचकट करण्यापेक्षा एकांकिकांचे सहज, सोप्या पद्धतीने आकलन होईल अशाच पद्धतीने प्रस्तुत पुस्तकाची प्रामाणिक मांडणी केलेली आहे. मानवी मनाच्या समृद्धीसाठी, वाङ्मयीन परिघाच्या विस्तारण्यासाठी तसेच वाङ्मयाभिरुचीच्या समृद्धीसाठी सदर पुस्तक बहुमूल्य ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451351707877,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivadak-Dalit-Ekankika_Samiksha_Dr-Madhav-Kadam_cnvt-1_ce7ccb48-b36f-4d07-92cc-9c0140a946fb.jpg?v=1771573376","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}