{"product_id":"निवडक-साहित्य-आशय-आणि-आकलन","title":"निवडक साहित्य आशय आणि आकलन","description":"\u003cp\u003eडॉ. अनंता सूर हे नव्या पिढीतील मराठी समीक्षेच्या प्रांतातील एक प्रतिथयश नाव आहे. त्यांचा हा पाचवा समीक्षाग्रंथ असून या पूर्वीचे ‘दया पवारांची कविताः आकलन आणि आस्वाद’, ‘दोन अर्वाचीन कवी’, ‘दशकाची निवडक काव्यसमीक्षा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दिशा आणि दिशा’ हे चारही ग्रंथ वाचकप्रिय ठरले.\u003cbr\u003eमराठी समीक्षेसाठी देण्यात येणार्या महाराष्ट्रातील नानाविध साहित्यसंस्थांच्या बावीस पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आजवर त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रस्तुत ‘निवडक साहित्य आशय आणि आकलन’ या समीक्षाग्रंथात नावाजलेल्या बावीस साहित्यकृतींची समीक्षा डॉ. अनंता सूर यांनी केली आहे. त्यामध्ये आठ काव्यसंग्रह, सहा कादंबर्या, दोन नाटके, चार आत्मकथने, एक चरित्रग्रंथ आणि एका कथासंग्रहाचा समावेश आहे.\u003cbr\u003e1960 मधील उद्धव शेळकेंच्या ‘धग’ कादंबरीपासून तर अगदी अलिकडच्या 2021 मधील कवी कैलास दौंड यांच्या ‘आगंतुकाची स्वगते’ पर्यंतची समीक्षा यामध्ये आलेली आहे. या अर्थाने दलित आणि ग्रामीण साहित्यातील साहित्यकृतींच्या समीक्षेचा अनुबंध या नव्या ग्रंथातून वाचकांना अनुभवता येईल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468384121061,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdak-Sahitya-Aashay-Aani-Akalan_Aananta-Sur_cnvt-1.jpg?v=1771931540","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}