{"product_id":"पंंढरीनाथ-पाटील-यांचे-राजकीय-व-सामाजिक-कार्य","title":"पंंढरीनाथ पाटील यांचे राजकीय व सामाजिक कार्य","description":"\u003cp\u003eपंढरीनाथ पाटील हे सन 1937-1952 या कालावधीत वऱ्हाड-मध्यप्रांत विधिमंडळाचे सदस्य होते. त्यांनी अर्थसंकल्प, व्यापारी स्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, कूळ कायदा अशा विविध प्रश्नांवर विचारलेल्या प्रश्नांवर मांडणी केली आहे. वऱ्हाड प्रांतात काँग्रेसमध्ये पडलेल्या गटबाजीच्याप्रसंगी पंढरीनाथ पाटील हे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याशी एकनिष्ठ होते. काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे केलेल्या कार्यामूळे सन 1962-1974 या कालावधीत पंढरीनाथ पाटील हे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी देशपातळीवरील अनेक प्रश्न व इंग्लंड, अमेरिका, चीन, व पाकिस्तान हया राष्ट्रांशी आपल्या देशाचे असणाऱ्या संबंधाविषयी प्रश्न संसदेत विचारल्याने त्यांची वैचारिक प्रगल्भता दिसून येते. शिवाय त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर असणारा अभ्यासही मांडलेला आहे. त्यांच्या संसदीय कार्यासंबंधीची माहिती पार्लमेंटमधील डिबेट्स फाईलचा वापर केल्याने हा संदर्भ ग्रंथ महत्वाचा वाटत आहे. एकंदरीत या लेखकांच्या लिखाणातून पंढरीनाथ पाटील या कृतिशील व्यक्ती विषयीच्या दूर्मिळ माहितीपट आधारित एका उपयुक्त ग्रंथाची भर मराठीत पडत आहे.    प्रस्तुत ग्रंथनिर्मितीसाठी अप्रकाशित व प्रकाशित साधनसामग्री गोळा करण्यात आली. ज्या संस्थांचे तसेच मान्यवरांचे सहकार्य सदरील ग्रंथ तयार करण्यासाठी मिळाले त्या सर्वांचे आम्ही सदैव ॠणी राहू. त्यामध्ये पंढरीनाथ पाटील यांचे पुतणे स्व. ज्योतिराव राऊत यांच्याकडे पंढरीनाथ पाटील यांच्या स्व:हस्ताक्षरातील\u003cbr\u003eडायरीतील आठवणी तसेच छायाचित्रे व तत्कालिन वृत्तपत्रांतील कात्रणे इ. अनमोल ठेवा मिळाला. त्यामुळे हा ग्रंथ वस्तूनिष्ठ स्वरुपाचा होवू शकला आहे. म्हणूनच स्व. ज्योतिराव राऊत व त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती प्रतिभाताई राऊत यांचे सदैव आभारी आहोत. राजश्री शाहू संशोधन मंडळ, श्री शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दस्तावेज तसेच मध्यप्रदेश शासन, भोपाळ येथील मध्यप्रांत-वऱ्हाड प्रांतिक विधिमंडळ व राज्यसभेच्या कामकाजाची भाषणे तसेच डिबेट्स यांचा उपयोग प्रस्तुत ग्रंथासाठी महत्वपूर्ण ठरला आहे.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48760196464869,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PandharinathPatilYancheRajkiya_SamajikKarya_cnvt-1.jpg?v=1775630751","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%82%e0%a4%a2%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}