{"product_id":"पर्यटन-आणि-स्थानिक-आर्थिक-विकास-tourism-and-local-economic-development","title":"पर्यटन आणि स्थानिक आर्थिक विकास (Tourism and Local Economic Development)","description":"\u003cp\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध विद्याशाखांतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत श्रेयांक व सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तृतीय वर्ष कला (TYBA) अर्थशास्त्र विषयातील व्यावसायिक कौशल्यसंवर्धन कोर्स (VSC) अंतर्गत सत्र-5 साठी संकेतांक : 613274 नुसार ‘पर्यटन आणि स्थानिक आर्थिक विकास’ हा विषय 2 श्रेयांकांसाठी निश्चित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विषयाचे सैद्धांतिक ज्ञान तसेच प्रत्यक्ष माहितीचे विश्लेषण करता यावे, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. \u003cbr\u003eया पुस्तकामध्ये अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा अत्यंत सोप्या, सुबोध व सविस्तर भाषेत आढावा घेतला आहे. पर्यटनाचा अर्थ व प्रकार, स्थानिक आर्थिक विकासातील पर्यटनाची भूमिका, नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यटन संसाधने, पर्यटन पायाभूत सुविधा, पर्यटनावर आधारित रोजगार संधी, शाश्वत पर्यटन व त्याचे नियम, पर्यावरणावरील प्रभाव, पर्यटन क्षेत्रातील महिला व युवक रोजगार, तसेच पर्यटन कौशल्ये, मूलभूत संभाषण, ग्राहक सेवा, पर्यटन विपणन आणि सोशल मीडिया प्रमोशन इत्यादी घटकांचा सविस्तर विचार करण्यात आला आहे. \u003cbr\u003eया पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर आधारित ज्ञान न देता, पर्यटन क्षेत्रातील व्यावहारिक कौशल्ये, आदरातिथ्य (Hospitality), पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक विकासातील सहभाग समजणे तसेच अर्थशास्त्रातील विविध संकल्पना, आकडेवारी, तक्ते, आलेख व त्यांचे विश्लेषण करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक ठिकाणी उदाहरणे आणि स्पष्टीकरणांचा वापर करण्यात आला आहे. तसेच, या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मूल्यांकनासाठी नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रश्न देण्यात आले आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, टिपा, संकल्पनात्मक प्रश्न तसेच आवश्यक त्या ठिकाणी तक्ते व आकृत्यांच्या 4 | प्रशांत पब्लिकेशन्स आधारे सराव करण्यासाठी प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन, लेखनकौशल्य, आकडेवारीचे विश्लेषण आणि परीक्षेची तयारी या सर्व बाबतीत हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. या पुस्तक\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67981141508325,"sku":"9789377763299","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ParyatanAaniSthanicAarthikVikas_Aadhav-1.jpg?v=1793708449","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-tourism-and-local-economic-development","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}