{"product_id":"पर्यावरणीय-भूगोल-environmental-geography","title":"पर्यावरणीय भूगोल (Environmental Geography)","description":"\u003cp\u003eपर्यावरण हा मानवी अस्तित्वाचा मूलभूत आधार असून मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरला आहे. वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अतिरेक वापर, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पर्यावरणीय प्रदूषण यांसारख्या गंभीर समस्यांनी संपूर्ण जगासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशील आणि जबाबदारीची भावना विकसित करणे ही काळाची गरज बनली आहे.\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 (NEP 2020) च्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणीय भूगोल’ हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल आकलन व्हावे, पर्यावरणीय समस्यांचे स्वरूप समजावे आणि शाश्वत विकासाचा दृष्टिकोन विकसित व्हावा हा या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.\u003cbr\u003eया पुस्तकामध्ये पर्यावरणीय भूगोलाची संकल्पना, स्वरूप व व्याप्ती, पर्यावरणाचे घटक, मानव-पर्यावरण परस्परसंबंध, पर्यावरणीय समस्या व आव्हाने, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, हवा, पाणी व मृदा प्रदूषण, जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरणीय व्यवस्थापन, शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि जैवविविधता अधिनियम 2002 यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा अभ्यासक्रमानुसार सविस्तर आणि सुलभ आढावा घेण्यात आला आहे.\u003cbr\u003eविद्यार्थीकेंद्रित आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोन ठेवून हे पुस्तक सोप्या, सुबोध आणि प्रवाही भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ विद्यापीठीन विद्यार्थ्यासाठीच नव्हे, तर भूगोल विषयाचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच पर्यावरण विषयात रस असलेल्या सर्व वाचकांसाठी उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52906536206565,"sku":"9789377760205","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ParyavarniyBhugol_RajendraPawar-1.jpg?v=1789812493","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-environmental-geography","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}