{"product_id":"पाणलोट-व्यवस्थापण","title":"पाणलोट व्यवस्थापण","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eपाणी हे जीवनाचे मूलभूत आधारस्तंभ आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, भूजलाचा वाढता उपसा आणि अनियमित पर्जन्यमान यांमुळे आज जलस्रोतांचे संवर्धन आणि योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर “पाणलोट व्यवस्थापन” हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी तृतीय वर्ष (सेमेस्टर V) भूगोल स्पेशलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पाणलोट व्यवस्थापन’ हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. \u003cbr\u003eपाणलोट क्षेत्राचा विकास हा केवळ मृदा व जलसंधारणापुरता मर्यादित नसून तो पर्यावरण संरक्षण, शेती विकास, भूजल पुनर्भरण, जैवविविधता संवर्धन आणि ग्रामीण जीवनमान उन्नती यांच्याशी निगडित आहे. या विषयाची संकल्पना, तत्त्वे, विविध तंत्रज्ञान, नियोजन प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची सुलभ व सर्वसमावेशक माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी, संशोधकांसाठी, कृषी व जलसंधारण क्षेत्रातील अधिकारी, अभियंते, स्वयंसेवी संस्था तसेच शेतकरी बांधव यांच्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. विषय अधिक समजण्यास सोपा व्हावा यासाठी आवश्यक तेथे उदाहरणे, आकृत्या आणि व्यावहारिक माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51090349883621,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PanlotVyavsthapan_Maski-1.jpg?v=1785321921","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%9f-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}