{"product_id":"पाणलोट-व्यवस्थापन-watershed-management","title":"पाणलोट व्यवस्थापन (Watershed Management)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तृतीय वर्ष कला (TYBA) या वर्गाच्या VSC (Vocational Skill Course) अंतर्गत या विषयाच्या जून 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) या पॅटर्ननुसार अभ्यासक्रमाला अनुसरून लिहिलेले “पाणलोट व्यवस्थापन” हे संदर्भ पुस्तक आमचे विद्यार्थी व प्राध्यापक बंधू भगिनी यांच्या हाती देतांना आम्हास विशेष आनंद होत आहे.\u003cbr\u003eभूगोल हा विषय तसा गतिमान असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, भूगोल अभ्यास मंडळ यांनी याविषयाचा समाजाभिमुख अभ्यासक्रम तयार करताना भूगोलाच्या माध्यमातून अनेक चालू घडामोडींचा परामर्श घेतला आहे. काळानुरूप बी. ए. पदवी पर्यंतचा लागू केलेला अभ्यासक्रम भूगोल अभ्यास मंडळाचा एक आगळा वेगळा प्रयत्न असल्याने आजपर्यंत मराठीतून कमी पुस्तके पाणलोट व्यवस्थापन या विषयावर उपलब्ध आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही हे संदर्भ कम पाठ्यपुस्तक परिश्रम पूर्वक प्रयत्नांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेट वरील माहिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींचा वापर केला आहे. या सर्व साधनांचा वापर करून अद्ययावत माहिती मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमच्या या परिश्रम पूर्वक प्रयत्नाचे स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. \u003cbr\u003eभूगोल विषयाची बांधिलकी, तज्ञ अभ्यासकांशी चर्चा, अहवाल, चर्चासत्र, आमचा थोडासा अनुभव आणि काही मूळ संदर्भ ग्रंथ यांच्या आधारे क्रमिक पुस्तकाच्या निकषानुसार या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. पर्यावरणीय संकल्पनाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध आकृत्या, नवीन संकल्पना, तक्ते, नवीन संज्ञा सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सदरचे पुस्तक सध्यकालीन पर्यावरणीय घटकांवर आधारित असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षांना तसेच नेट \/सेट परीक्षांना ही उपयोगी ठरेल असा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52906591322341,"sku":"9789377761578","price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PanlotVyavsthapan_Chavan-1.jpg?v=1789813365","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%9f-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-watershed-management","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}