{"product_id":"पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत-1","title":"पाश्चिमात्य राजकीय विचारवंत (Western Political Thinkers)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48461600555237,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pashchimatya-Rajkiya-Vicharwant_Dr-Dilipsingh-Nikumbh_cnvt-1.jpg?v=1771918900","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}