{"product_id":"पूज्य-साने-गुरुजी-विचार-जीवन-आणि-साहित्य","title":"पूज्य साने गुरुजी -  विचार, जीवन आणि साहित्य","description":"\u003cp\u003eभारतीय संस्कृतीत संत, समाजसुधारक आणि साहित्यिक हे केवळ व्यक्ती नसतात; ते एका युगाचे प्रतिनिधित्व करतात. अशाच तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे साने गुरुजी. त्यांचे जीवन म्हणजे करुणा, समता, राष्ट्रनिष्ठा आणि मानवतेची अखंड साधना होय. त्यांनी केवळ लेखणीने नव्हे, तर आपल्या संपूर्ण आयुष्याने समाजाला मूल्यांचा संदेश दिला.\u003cbr\u003eसाने गुरुजींच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता - मानवातील मानवता जागवणे. गरीब, शोषित, अस्पृश्य आणि उपेक्षित यांच्याविषयी त्यांच्या मनात अपार करुणा होती. शिक्षण, साहित्य आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी मूल्यांची पेरणी केली. त्यांचे लेखन हे केवळ शब्द नव्हते; ते त्यांच्या अंतःकरणातील वेदनेचे आणि प्रेमाचे प्रतिबिंब होते.\u003cbr\u003eत्यांच्या जीवनाचा उद्देश एकच होता - समाज अधिक न्याय्य, समताधिष्ठित आणि प्रेममय व्हावा. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, तुरुंगवास भोगला, परंतु कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. माणूस मोठा की धर्म? ङ्घ या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आपल्या आचरणातून दिले - माणूसच सर्वात मोठा आहे.\u003cbr\u003eत्यांच्या साहित्यकृतींमध्ये विशेषत्वाने ’यामची आई’ हे पुस्तक अमर ठरले. या कथेतील आईचे संस्कार, कष्टमय जीवन आणि नैतिक मूल्ये आजही प्रत्येक घराला दिशा देतात. गुरुजींच्या शब्दांतून आईचे रूप म्हणजे संस्कारांचा झरा आहे; आणि त्या झऱ्यातून वाहणारे पाणी आजच्या पिढीलाही ताजेतवाने करते.\u003cbr\u003eसाने गुरुजींच्या जीवनाचा गाभा होता - प्रेम, समता आणि सेवा. त्यांनी शिक्षणाला केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन मानले नाही; तर ते चारित्र्यनिर्मितीचे माध्यम आहे, असे ठामपणे मांडले. त्यांना वाटत होते की समाजातील विषमता आणि अन्याय दूर करण्यासाठी प्रथम मनाची शुद्धी आवश्यक आहे.\u003cbr\u003eत्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते; तर मनातील भीती, अज्ञान आणि भेदभाव यांपासून मुक्तता हेच खरे स्वातंत्र्य होते. म्हणूनच त्यांनी लेखन, प्रवचन आणि कृती यांद्वारे समाजजागृती केली. त्यांचे जीवन एक दीपस्तंभ होते - स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारे.\u003cbr\u003eआजचा काळ वेगवान आहे. तंत्रज्ञान, स्पर्धा, भौतिक आकर्षणे आणि सामाजिक माध्यमे यांच्या गर्दीत तरुणांचे मन अनेकदा संभ्रमित होते. अशा वेळी साने गुरुजींचे विचार युवकांना स्थैर्य देतात. त्यांनी शिकवलेला प्रामाणिकपणा आजही तितकाच आवश्यक आहे. त्यांनी जपलेली समता आणि बंधुता समाजातील\u003cbr\u003eतणाव कमी करू शकते. त्यांनी दिलेला मातृसंस्कारांचा आदर्श कुटुंबव्यवस्थेला बळ देतो. त्यांनी मांडलेली मानवतावादी भूमिका आजच्या विभाजनकारी वातावरणात मार्गदर्शक ठरते. आजच्या पिढीला यश हवे आहे; पण मूल्यांची जोड नसलेले यश टिकाऊ नसते. साने गुरुजींचे जीवन सांगते की खरे यश म्हणजे स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी जगणे.\u003cbr\u003eसाने गुरुजींचे आयुष्य हे एक संदेश आहे - ङ्गप्रेम करा, सेवा करा आणि सत्याशी निष्ठावान रहा.ङ्घ ही प्रस्तावना त्या महान व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञ अभिवादन आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणेचा दीप आहे.            \u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48907831705829,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SaneGuruji_LAPatil-1.jpg?v=1777461962","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}