{"product_id":"प्रकाशाचे-बेट-स्वातंत्र्य-सैनिक-कर्मवीर-अण्णासाहेब-व्यंकटराव-रणधीर-यांचे-चरित्र","title":"प्रकाशाचे बेट (स्वातंत्र्य सैनिक कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचे चरित्र)","description":"\u003cp\u003eथोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण महर्षी, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचे अध्वर्यू माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजीराव रणधीर हे खानदेशातील गांधी विचारांचे अनुयायी, साने गुरुजी, संत गाडगेबाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांच्या विचारांचे पाईक म्हणून महाराष्ट्रातल्या थोर पुरुषांच्या मालिकेत विराजमान आहेत. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात कर्मवीरांचे योगदान सुवर्णाक्षरांनी मंडित आहे. राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर बोराडीची नाममुद्रा कोरली गेल्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर अण्णासाहेबांनाच जाते. \u003cbr\u003eमागासवर्गीय मानल्या गेलेल्या जातीत जन्माला येऊन, सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेशी आणि अभावांशी लढून, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व झोकून देऊन, सातपुड्याच्या पायथ्याशी वंचितांचे जीवन जगणाऱ्या समूहाचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची गंगा आणून, राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाही मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करून, पुरोगामी महाराष्ट्र ही प्रतिमा अखंडित राहण्यासाठी पुरोगामी चळवळींसाठी उत्तरायुष्य वेचून कर्मवीरांनी आपली ‘कर्मवीर’ ही लोकबिरूदावली यथार्थ ठरवली. \u003cbr\u003eकाळ बदलतो, जुनी माणसे जगण्याच्या रंगभूमीवरून निघून जातात. नवी माणसे येतात. काळाचे अखंड चक्र सुरू राहते. तथापि विचारधारा, कर्मधारा या शाश्वत गोष्टी असतात. कर्मवीर अण्णासाहेब ही एक संस्था अशीच शाश्वत गोष्ट आहे. विचार आणि कार्याच्या रूपाने कर्मवीर अण्णासाहेब अजरामर आहेत. त्यांची विचारशिल्पे आणि कार्यशिल्पे याची ग्वाही देतात. \u003cbr\u003eनव्या पिढीला आदर्शांची वानवा आहे. सांप्रतकालीन राजकारण्यांनाही उत्तम अशा लोकप्रतिनिधीच्या आदर्शाची वानवा आहे. समर्पित, एकनिष्ठ अशा राष्ट्रप्रेमीच्या आदर्शाची वानवा आहे, विद्यार्थी केेंद्रबिंदू मानून ज्ञानमंदिरे स्थापन करणाऱ्या शाळासंचालकाच्या आदर्शाचीही वानवाच आहे. सत्यनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ अशा समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्याचा मोठा कालखंड समर्पित करणाऱ्या समाजसेवकाच्या आदर्शाचीही वानवा आहे. अशा चोहोबाजूने मूल्य ऱ्हासाच्या अंधारपर्वात, आदर्शांच्या अभावात कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजीराव रणधीर यांचे जीवन हा लखलखता प्रकाशतारा आहे. प्रकाशाचे बेट आहे. \u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथनिर्मितीच्या प्रेरणा सुस्पष्ट आहेत. समाजाच्या सांप्रतकालीन सर्वांगीण पराभवाच्या या काळात समाजासमोर काही एक आदर्श ठेवणे काळाची अपरिहार्य गरज आहे. कर्मवीर अण्णासाहेबांचे जीवन आणि कार्य समाजासमोर विशेषत: नव्या पिढी समोर ठेवणे ही अपरिहार्य गरज आहे. यापूर्वी वर्तमानपत्री लेखातून, विविध निमित्ताने प्रकाशित झालेल्या स्मरणिकांतून, संस्थेच्या ‘सत्यव्रत’ या मुखपत्रातून, काही लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथांतून कर्मवीर अण्णासाहेबांचे जीवनचरित्र उपलब्ध आहे. त्या ग्रंथसंपदेमध्ये कर्मवीरांच्या प्रत्यक्षात संपर्कात आलेल्या शेकडो बंधू- भगिनींच्या आठवणींचा समावेश करून हा ग्रंथ तयार झाला आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67789463027941,"sku":"9789377765118","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PrakashacheBet_KarmvirAnnasahebVyankatraoRandhir_DrTusharRandhe-1.jpg?v=1792588490","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}