{"product_id":"प्रकृतीक-भूगोलाची-मूलतत्त्वे-principles-of-physical-geography","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे Principles Of Physical Geography","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेला नाही. त्यात लेखकाने थोडा बदल केला आहे. अभ्यासक्रमानुसार पहिले प्रकरण फक्त भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व या मुद्द्यांवर आधारित आहे.परंतु अभ्यासक्रम हा प्राकृतिक भूगोलावर असल्यामुळे प्राकृतिक भूगोल- व्याख्या, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व हे मुद्दे अभ्यासक्रमात असणे अभिप्रेत असावेत असे समजून या मुद्यांचा समावेश या प्रकरणात केला आहे. तसेच घटक दोन मधील ‘सूर्यकुल किंवा सूर्यमाला’ या मुद्द्याचा समावेश पाठ्यांशाच्या मांडणीच्या सोयीच्या दृष्टीने प्रकरण 2 मध्ये केला असून त्याच घटकातील ‘ग्रहणे’ हा मुद्दा शेवटच्या प्रकरणात घेण्यात आला आहे. प्रकरण 2 मध्ये सूर्यकुलाचा अभ्यासानंतर पृथ्वीची म्हणजेच ‘सूर्यकुलाची उत्पत्ती’ हा मुद्दा तिसऱ्या प्रकरणात समाविष्ट केला आहे. घटक चार मधील अक्षांश व रेखांश या मुद्द्याचा अंतर्भाव पुढील चौथ्या\u003cbr\u003eप्रकरणात केला आहे. प्रकरण पाचवे अर्थात पृथ्वीच्या गती परिवलन व परिभ्रमण आणि त्यांचे परिणाम यावर लिहिले आहे. प्रकरण सहा- वेळेचे मापन- स्थानिक वेळ, प्रमाण वेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा या मुद्द्यांवर आधारित आहे. शेवटच्या प्रकरणात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार फक्त सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यावरच लिहिणे अपेक्षित असले तरी ग्रहणे ही संकल्पना समजून घेण्यासाठी चंद्र व चंद्रकला या मुद्द्यांचा अभ्यास आवश्यक वाटल्याने लेखकाने या मुद्द्यांना हात घातला आहे. कोणतेही अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक हे फक्त अभ्यासक्रमातील मुद्द्यांचा विचार करूनच लिहिले पाहिजे असे जरी अपेक्षित असले तरी पुस्तकाच्या पूर्णत्त्वाच्या दृष्टीने लेखकाने त्यापेक्षा काही अधिकची माहिती दिली आहे. हा भाग केवळ अभ्यासकांनां अधिक ज्ञानवृद्धी व्हावी या दृष्टीने दिला आहे. कारण पुस्तक फक्त परीक्षा आणि अभ्यासक्रम याच्या चौकटीत लिहून चालत नाही. कृपया लेखकाच्या भावना समजून पुस्तकाचा अभ्यास करावा. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 66 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी पाठ्यांशातील प्रत्येक मुद्द्यावर अतिशय बारकाईने अभ्यास करून सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. सर्व प्रश्नांची गुणवत्ता उच्चप्रतीचे असून बरेच प्रश्न भौगोलिक संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. त्यामुळे एम. पी. एस्सी. यु. पी. एस्सी तसेच नेट सेट यासारख्या परीक्षांची\u003cbr\u003eतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना स्वाध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48632546394341,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PrakritikBhugolachiMultattve_DrShankarChaudhari-1.jpg?v=1774946496","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-principles-of-physical-geography","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}