{"product_id":"प्रगत-समग्रलक्षी-अर्थशास्त्र-भाग-२-advanced-macroeconomics-ii","title":"प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र भाग - २ (Advanced Macroeconomics - II)","description":"\u003cp\u003eअभ्यास मंडळाने सत्र IV साठीचा अभ्यासक्रम एकूण सहा घटकात विभाजित केला आहे. दिलेल्या अभ्यासक्रमानुसार ‘प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. प्रकरण एक हे पैशाचा पुरवठा शिर्षकाचे आहे. यात पैशाचा अर्थ व कार्ये, डिजिटल चलन, पैशाचा पुरवठा यात रिझर्व्ह बँकेचे M1, M2, M3, M4 हे मापन तर अलीकडील L1, L2, L3 हे मापन, पतपैशाची निर्मिती आणि त्याचे नियंत्रण याचे स्पष्टीकरण व विवेचन केले आहे. दुसरे प्रकरण पैशाच्या मागणीचे आहे. यात पैशाची मागणी, तिचे निर्धारक, पैशाच्या मागणीचे हेतू, पैशाच्या मागणीचे सिद्धांत, फिशरचा चलनसंख्यामान सिद्धांत, केंब्रिज दृष्टिकोण, केन्सचे स्पष्टीकरण याची चर्चा व विवेचन केले आहे. भाववाढ या तिसऱ्या घटकात भाववाढ, भावघट, मंदीयुक्त भाववाढ यांचा अर्थ, भाववाढीचे प्रकार, भाववाढीचे मागणी, ओढजन्य व खर्चदाबजन्य भाववाढ, भाववाढीचे मापन व कारणे यांचा समावेश आहे. व्यापारचक्रे या चौथ्या घटकात व्यापारचक्र अर्थ, वैशिष्ट्ये, अवस्था आणि व्यापारचक्र विरोधी चलनविषयक व वित्तीय धोरणाचा समावेश आहे. सार्वजनिक आयव्यय या पाचव्या घटकात सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, व्याप्ती व महत्व, सार्वजनिक महसूल, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, अर्थसंकल्प, महसूली आणि वित्तीय तूट यांचे स्पष्टीकरण केले आहे. समग्रलक्षी आर्थिक धोरणे या सहाव्या घटकात आर्थिक धोरणांचा अर्थ व उद्देश, मुद्रावाद आणि पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र, लाफेर वक्र याचे स्पष्टीकरण केले आहे.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48608149766373,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PragatsamagralaskshiArthshastra_N.L.Chavan-1.jpg?v=1774443636","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8-advanced-macroeconomics-ii","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}