{"product_id":"प्रसारमाध्यमे-आणि-मराठी","title":"प्रसारमाध्यमे आणि मराठी","description":"\u003cp\u003e1990 नंतर आलेल्या ‘खाउजा’ धोरणामुळे परिवर्तन पावलेल्या परिस्थितीने ‘जग हीच एक बाजारपेठ’ बनली. काळ जसा झपाट्याने पुढे जाऊ लागला तसे जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये बदल जाणवू लागले. संगणक-इंटरनेटचे जाळे पसरले. गुगलवर माहितीचा साठा आला. दूरध्वनी ऐवजी मोबाईल आले. त्यांनी स्मार्ट रूप धारण केले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर असे सोशल मीडियाचे एक जाळे पसरले. तंत्रज्ञान प्रगत, अद्ययावत झाले. पाहता पाहता या तंत्रज्ञानाने जगातील सर्व क्षेत्रावर पकड मजबूत केली. जग जवळ आणण्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरली ती नवतंत्रज्ञानाचे बळ लाभलेली प्रसारमाध्यमे. प्रसारमाध्यमांच्या स्वरूप व वापरात होत गेलेल्या या बदलाबरोबरच त्याद्वारे अभिव्यक्त व सादर होणार्या कार्यक्रमांतही बदल होत गेले. या बदलांना अनुसरून जनमनावर गारुड करणार्या या प्रसारमाध्यम क्षेत्रात मोठी उलाढाल होऊ लागली. रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या. स्वाभाविकच, त्याबाबतचे तंत्र व कौशल्ये शिकवण्याची गरज निर्माण झाली. तंत्र व कौशल्ययुक्त कारागिरीला नवकल्पनायुक्त सर्जनशीलतेची, भाषिक कौशल्याची जोड लाभली तर; प्रसारमाध्यमांच्या विस्ताराबरोबरच सांस्कृतिक जीवन संपन्न करणार्या उज्वल भविष्याचेही चित्र उभे राहू शकते…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458060169445,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prasarmadhyame-Aani-Marathi_Dr-Ujjwala-Bhor_cnvt-1.jpg?v=1771834059","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}