{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-मूलतत्त्वे","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386717188325,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugolachi-Multattve_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770721478","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}