{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a5%88%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%8c%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}