{"product_id":"बँकिंग-व-वित्त-banking-and-finance","title":"बँकिंग व वित्त (Banking and Finance)","description":"\u003cp\u003eबँकिंग आणि वित्त-अ हे सत्र-3 व 4 चे एकत्रित क्रमिक पुस्तक व संदर्भग्रंथ आपल्या हाती देतांना आम्हांला विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय व संदर्भसाहित्याच्या आधारे भारतीय बँक व्यवस्थेच्या संरचनेचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. वाणिज्य शाखेचे विद्यार्थी व बँक व्यवस्थेच्या रचनेचे अभ्यासक यांना विषयाची जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढावी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखाण करतांना बँकविषयक संकल्पनांची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. त्यासंदर्भात बँकव्यवसायातील अलीकडील बदल, अद्ययावत आकडेवारी व माहीतीचे संदर्भ दिले आहे. या पुस्तकाचे लिखाण करतांना अभ्यास मंडळाचे सुचविलेल्या संदर्भ ग्रंथाबरोबर इतरही आवश्यक व उपयुक्त ग्रंथांचा आवर्जुन वापर केला आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी असणाऱ्या संदर्भ ग्रंथाचा वापर करून विद्यार्थ्यांना बँकिंग विषयक स्पर्धा परीक्षांना सामोरे जाता यावे हाच उद्देश आहे. आर.बी.आय.चे संकेतस्थळ व विविध अहवालांचाही संदर्भ घेतला गेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाच्या मुल्यांकनांच्या आकृतीबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48883835502821,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BankingAniVitta_DrSRJawale-1.jpg?v=1776918322","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4-banking-and-finance","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}