{"product_id":"बेमाथनी","title":"बेमाथनी","description":"\u003cp\u003e'यशोधरा', 'आवली', 'एकांताचा वास' आणि 'नाते' या कवितांमध्ये एकप्रकारे अव्हेरलेपणाच्या, दुरावलेपणाच्या अंतरभानातून परात्मतेच्या जाणीवा दिसून येतात. तसेच प्रपंच-परमार्थ, प्रकृती-निवृत्ती, पुरुष-स्त्री अशा द्वंद्वांची तुलना करताना, कालातीत व्यवस्थांनी त्यात स्त्रीला प्रतिष्ठा दिलेली नाही, याचा दाह कबीला आहे. म्हणून पुरुष श्रेष्ठत्वातून पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांच्या कर्तृत्वाला गौण ठरवल्याची उपरोधिक भावना, तिरकसपणे या कवितांतून व्यक्त होते. त्याचप्रमाणे या कवितांच्या आशयांमध्ये अनुक्रमे, 'गौतम-सिद्धार्थ', 'तुकाराम', आणि 'विठ्ठल', अशा वीरनायकांचे प्राक्कथात्मक स्वरूप हे ब्रह्मवैवर्तपुराणामध्ये नारद ऋर्षीच्या प्राक्कथेप्रमाणे सूचित होत आहे, असे वाटते.. या आख्यायिकाप्रमाणे 'ब्रम्हदेवाने नारदास उत्पन्न केल्यावर दारसंग्रह करून प्रजा निर्माण करण्याची आज्ञा केली होती, पण ती त्याने प्रथम अमान्य केल्यामुळे त्यास शाप दिला होता'.\u003cbr\u003eदुसरी गोष्ट, 'यशोधरा', 'आवली' आणि 'एकांताचा वास' या कवितांच्या आशयामध्ये जसा प्रपंचापासून विन्मुख होत, परमार्थाचा कल्पनाबंध सूचित झालेला आहे; तसा प्रपंचातून विन्मुख न होताही परमार्थ करता येतो; असा कल्पनाबंधही 'वारकरी संत कवयित्री', 'वाल्ह्याची बायको', आणि 'सत्यवान सावित्री' या कवितांमध्ये सूचित झालेला आहे\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48764160278757,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bemathani_DrPrakashSapkale-1.jpg?v=1775721455","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%a8%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}