{"product_id":"भारताची-राष्ट्रीय-सुरक्षा-1","title":"भारताची राष्ट्रीय सुरक्षा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eउपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी, आक्रमक व शत्रुला विस्मयाचा धक्का देणार्या सर्जिकल स्ट्राईक्स, बालाकोट एअरस्ट्राईक आणि डोकलाम विवादात घेतलेल्या ठाम व कणखर भूमिकेमुळे चीनी सैन्याला घ्यावी लागलेली माघार या प्रासंगिकतेतून भारताने आज आक्रमक व वास्तववादी सुरक्षा धोरणाचा अंगिकार केल्याचे स्पष्ट होते. परिणामी ‘सॉफ्ट स्टेट’ ही भारताची आजवरची प्रतिमा पुसून टाकण्यात आपण बर्यापैकी यशस्वी झालो आहोत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय सुरक्षा ही देशासाठी प्राधान्यक्रमाची बाब असून कोणतीही आर्थिक, औद्योगिक प्रगती किंवा विकास हा पुरेशा सुरक्षेशिवाय निरर्थक आहे. प्रादेशिक समस्यांमध्ये भाषा, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, धार्मिक व आर्थिक समस्या तसेच सांप्रदायिकता, स्थलांतर, निरक्षरता, लिंगभेद, नव्याने प्रस्थापित झालेली समाज माध्यमे व त्यापासून होणारे दुष्परिणाम, आरोग्य, पर्यावरण, माओवादी चळवळी, शेजारील राष्ट्रांचा अमानुष दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि भारताच्या सीमा समस्या व सुरक्षा या सर्व समस्या आणि नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा यथायोग्य परामर्श ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रशक्तीवर विविध समस्यांचा परिणाम होऊन देश दुबळा कसा बनतो व त्याचबरोबर करावयाच्या उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477771956453,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Rashtriy-Surksha_cnvt-1.jpg?v=1772189928","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}