{"product_id":"भारताची-संरक्षण-संघटना-आणि-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता","description":"\u003cp\u003e1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा\/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477796892901,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Savrankshan-Sanghatna-Ani-Rashtriya-Surkshitata_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1772190769","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}