{"product_id":"भारतातील-किल्ले-आणि-स्वातंत्र्य-चळवळीतील-योगदान-इ-स-1818-1947","title":"भारतातील किल्ले आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान (इ.स. 1818  1947)","description":"\u003cp\u003eशहाजी राजांनी कर्नाटकातील अनेक प्रदेशात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यात चित्रदुर्ग हा किल्ला महत्त्वाचा होय. मराठ्यांनी हा दुर्ग आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. तेथील पाळागारांची मदत घेवून शत्रूंचा पराभव केला. ओनाके ओव्हा या स्त्रीची कथा अंगावर शहारे आणणारी होती. तिचे पती जेवायला गेले आणि त्याचवेळी गुप्तमार्गाने टिपूच्या लष्कराचे किल्ल्यावर आक्रमण होवू लागले. त्यावेळी या स्त्रीने मुसळ हातात घेवून एकेका सैन्याला स्वर्गात कसे पाठविले याची ही कहानी, स्त्री जन्मा तुझी अदभूत कहानी या नावाने अभिमानास्पद आहे. एक शूर स्त्री किती पराक्रम गाजवून दुर्गाचे रक्षण करू शकते हे वाचले म्हणजे विस्मय होतो. उदगीर संत बाबांच्या नावाने उदगीरचा किल्ला ओळखला जातो. येथे घडणाऱ्या कथा आणि या दुर्गाने स्वातंत्र्य रक्षणासाठी केलेला संघर्ष मनाला चटका लावून जातो. या दुर्गातील किल्लेदार हातमखान याची औरंगजेब बादशहा जेव्हा तोरणा दुर्गावर बदली करतो तेव्हा त्याने औरंगजेबाला लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यांत तो म्हणतो की. तोरणा किल्ला म्हणजे आकाशाशी स्पर्धा करणारा किल्ला. या पृथ्वीवरील डोंगर या किल्ल्याच्या पासंगालाही उतरू शकणार नाहीत, येथे राहतात भुते, राक्षस आणि सैतानी वृत्तीचे काफर. येथील वाऱ्यात शिलाखंड तरंगत असल्यासारखे वाटतात. अशा रौद्रता आणि राकटपणा असलेल्या किल्लयात मला रहावे लागत आहे अतएव या क्षुद्र माणसावर परमेश्वराने कृपा करावी असे तो पत्रात म्हणतो. या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बळकट आणि जिंकण्यास कठिण होते ते आपणास दिसते.\u003cbr\u003eदुर्गांची ही अस्मिता सर्वांना कळो याच भावनेने हा ग्रंथ वाचकांनी वाचावा आणि त्यावर अधिक संशोधन व्हावे हीच या प्रसंगी अपेक्षा. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67603713196261,"sku":"9789377760366","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BharatatilKilhe_GBShaha-1.jpg?v=1790942216","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%87-%e0%a4%b8-1818-1947","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}