{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-indian-economy-1","title":"भारतीय अर्थव्यवस्था Indian Economy","description":"\u003cp\u003eभारतीय अर्थव्यवस्था ही विविधता, क्षमता, संधी आणि आव्हाने यांचा संगम असलेली अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात असून तंत्रज्ञान, कौशल्य विकास, नवउद्योजकता, डिजिटल अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि मानवी विकास या घटकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील या बदलत्या प्रवाहांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून न करता, त्यांचा दैनंदिन आर्थिक जीवनाशी आणि देशाच्या विकास प्रक्रियेशी संबंध जोडून करावा, हा या पुस्तकामागील प्रमुख उद्देश आहे.\u003cbr\u003eया पुस्तकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील संभावना व समस्या, उदयोन्मुख अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, विकसित भारताचे उद्दिष्ट आणि मानवी विकास निर्देशांक यांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच कृषी, उद्योग आणि सेवा या तीन प्रमुख क्षेत्रांची वैशिष्ट्ये, समस्या व भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी-व्यवसायातील नवीन प्रवाह, हवामान बदल, औद्योगिक विकास, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, कौशल्य विकास, नवउद्योजकता आणि मुद्रा योजना यांचाही समावेश करण्यात आला आहे. सेवा क्षेत्राचे वाढते महत्त्व आणि कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांमधील परस्परसंबंध स्पष्ट करून विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वांगीण समज विकसित व्हावी, या उद्देशाने विषयांची सुलभ, सुबोध आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक लिहिताना विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा, आर्थिक संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचा क्रमबद्ध अभ्यास करता यावा आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील समकालीन बदलांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहता यावे, याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. क्लिष्ट आर्थिक संकल्पना \u003cbr\u003eशक्य तितक्या सोप्या, स्पष्ट आणि प्रवाही मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर अर्थशास्त्र विषयाचे अध्यापक, संशोधक आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या इतर वाचकांसाठीही उपयुक्त ठरेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.\u003cbr\u003eपुस्तक लेखनाच्या प्रक्रियेत विविध संदर्भग्रंथ, अहवाल, शासकीय प्रकाशने आणि उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा आधार घेण्यात आला आहे. तथापि, अर्थव्यवस्था ही सतत बदलणारी प्रक्रिया असल्यामुळे आकडेवारी, धोरणे आणि योजनांमध्ये कालानुरूप बदल होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यकतेनुसार अद्ययावत आणि अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेणेही महत्त्वाचे आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोन विकसित करण्यास, भारतीय अर्थव्यवस्थेतील समस्या व संधी समजून घेण्यास आणि भविष्यातील विकसित भारताच्या निर्मितीमध्ये आपली भूमिका ओळखण्यास निश्चितच मदत करेल, \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67614029250789,"sku":"9789377761493","price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaArthvyavastha_Dalavi_Bharaskar-1.jpg?v=1791195941","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-indian-economy-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}