{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्थेची-सद्यस्थिती-भाग-1-scenario-of-indian-economy-i","title":"भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती (भाग 1) - Scenario of Indian Economy-I","description":"\u003cp\u003eIndian Economic Scenario म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची सध्यस्थिती होय. याचा अर्थ एखाद्या विशिष्ट काळात भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, रचना, प्रगती, समस्या, धोरणे व उपाय-योजना आणि भविष्यातील दिशा यांचे सर्वंकष चित्रण होय. सदर अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात जागतिक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, जागतिक-स्थिती, एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय लोकसंख्या, मानव संसाधन विकास, कृषी क्षेत्र, उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास, पायाभूत संरचना या प्रमुख मुद्द्यांचा समावेश केला आहे.\u003cbr\u003eआजची भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर उल्लेखनीय ठरणारी अर्थव्यवस्था आहे. 2020 च्या दशकात जागतिक पातळीवर अनेक अनपेक्षित घटना घडल्यात, जसे कोविड-19 ची साथ, युक्रेन-राशिया युद्ध, अमेरिका- इस्राईल आणि इराण युद्ध, भारत-अमेरिका, आणि चीन यांच्यातील टॅरिफ वार, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा लहरीपणा व अवास्तव वाढलेले टॅरिफ दर किंवा बंदी, खनिजतेलाचे वाढते भाव यामुळे जगातील सर्वच देश होरपळून निघत आहेत. या स्थितीतही जगात एक अर्थव्यवस्था आहे, जी प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी सरासरीने 6% पेक्षाही अधिक दराने आर्थिक विकास साध्य करत आहे. ती अर्थव्यवस्था म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था होय. याचे संपूर्ण श्रेय जुलै 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांना, नियोजन आयोग आणि निती आयोगाला दिले पाहिजे. गेल्या तीन दशकात भारताने जी प्रगती केली, त्या आधारावर आज भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. आजचा भारत हा केवळ आर्थिक आघाडीवर अग्रेसर नसुन राजकीय मुत्सदेगिरीत ही अग्रेसर आहे. जागतिक अर्थकारण, राजकारण, शांतताबाबत भारताचे मत विचारात घेतले जात आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67614196498661,"sku":"9789377762742","price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaArthvyavasthechiSadyasthiti_N.L.Chavan-1.jpg?v=1791201666","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-scenario-of-indian-economy-i","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}