{"product_id":"भारतीय-ज्ञान-प्रणाली-वैद्यकशास्त्र-व-महाराष्ट्रातील-शिल्पकला-यांचा-एक-समग्र-अभ्यास-medicine-and-sculpture-a-comprehensive-study","title":"भारतीय ज्ञान प्रणाली, वैद्यकशास्त्र व महाराष्ट्रातील शिल्पकला यांचा एक समग्र अभ्यास (Medicine and Sculpture: A Comprehensive Study)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eज्ञान ही मानवाच्या प्रगतीची सर्वात मोठी शक्ती आहे. भारताला प्राचीन काळापासून समृद्ध ज्ञानपरंपरेचा वारसा लाभला असून, शिक्षण, विज्ञान, तत्त्वज्ञान, वैद्यक, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रांत भारतीय ज्ञानप्रणालीने जगाला मौल्यवान योगदान दिले आहे. या समृद्ध परंपरेचा अभ्यास विद्यार्थ्यांना सुलभ आणि अभ्यासक्रमाभिमुख पद्धतीने करता यावा, म्हणून भारतीय ज्ञान प्रणाली, वैद्यकशास्त्र, व शिल्पकला यांचा समग्र अभ्यास करून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. \u003cbr\u003e“भारतीय ज्ञान प्रणाली, वैद्यकशास्त्र व महाराष्ट्रातील शिल्पकला यांचा एक समग्र अभ्यास” या मुख्य विषयावर आधारित हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हला अत्यंत आनंद होत आहे. भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे (2020) मुंबई विद्यापीठाने 2025-26 पासून सुरु होणाऱ्या तृतीय वर्ष कला शाखेच्या NEP वर आधारित अभ्यासक्रमानुसार ’आधुनिक भारतातील भारतीय ज्ञानप्रणाली (मेजर)’, ’भारतातील वैद्यकशास्त्राचा इतिहास (SEC)’ आणि ’महाराष्ट्रातील शिल्पकलेचा इतिहास (MINOR)’ या विषयांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. \u003cbr\u003eअलिकडे मुंबई विद्यापीठात मराठी माध्यमातून अनेक विद्यार्थी इतिहासाचा अभ्यास करीत आहेत. परंतु त्यांना मराठी भाषेत ग्रंथ उपलब्ध होत नव्हते अशा विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी हा ग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे लिहिला आहे. प्रत्येक विषयातील संकल्पना सोप्या, नेमक्या आणि मुद्देसूद नोट्सच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वाचे घटक, ऐतिहासिक संदर्भ, संकल्पनात्मक मांडणी आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहिती यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. \u003cbr\u003eया पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागाचे स्वतंत्र प्रकरण अगदी मुद्देसूद मांडलेले आहे. त्यामुळे हे मुद्दे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणे सोपे जाणार आहे. या पुस्तकाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते ज्ञान उपलब्ध करून देणे एवढाच नसून, भारतीय ज्ञानपरंपरा, वैद्यकशास्त्राचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राच्या समृद्ध शिल्पकलेचा सांस्कृतिक वारसा यांविषयी अभ्यासकांमध्ये अभ्यासाची आवड, चिकित्सक दृष्टी आणि अभिमान निर्माण करणे हा आहे. \u003cbr\u003eहे पुस्तक तयार करताना विविध संदर्भग्रंथ, संशोधनपर लेख, विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा आधार घेण्यात आला आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67603531104485,"sku":"9789377762131","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaDnyanPranali_Vaidyakshastravamaharashtratilshilpkalayanchaeksamagraabhyas_kekane-1.jpg?v=1790940087","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8-medicine-and-sculpture-a-comprehensive-study","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}