{"product_id":"भारतीय-राजकारण","title":"भारतीय राजकारण","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या TYBA च्या NEP च्या अभ्यासक्रमानुसार “भारतीय राजकारण” या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. भारतीय राजकारण ही एक बहुआयामी, गतिशील आणि सतत बदलणारी प्रक्रिया आहे. विविधतेतून उभे राहिलेले राजकीय व्यवहार, सामाजिक संरचना आणि आर्थिक धोरणे हे भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाची निर्मिती करताना भारतीय राजकारणाच्या सैद्धांतिक तसेच व्यवहारिक पैलूंचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना एक समग्र दृष्टीकोन प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात पक्षप्रणाली आणि राजकीय पक्ष या मूलभूत घटकांपासून चर्चा सुरू करून भारतातील पक्षप्रणालीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील एकपक्षीय वर्चस्व व आघाडीचे राजकारण यांचे विश्लेषण करण्यात आले आहे यामध्ये राष्ट्रीय पक्षांच्या विचारधारा आणि त्यांच्या सामाजिक आधाराचे तुलनात्मक विश्लेषण करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आम आदमी पक्ष आणि यांच्या विचारसरणीचा व सामाजिक आधाराचा अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय समाजरचनेत जात हा एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे ‘जात आणि राजकारण’ या विषयाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रभुत्वशाली जातींचे राजकारण, इतर मागास वर्ग (OBC), दलित आणि आदिवासी जातींचे राजकारण यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. राजकीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचा नमुना, 1991 नंतरचे नवीन आर्थिक धोरण, तसेच प्रादेशिक असमतोल आणि विकासातील विषमता यांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. गरिबी आणि कल्याणकारी योजनाच्या राजकारणाच्या माध्यमातून राज्याच्या हस्तक्षेपाची भूमिका आणि त्याचे परिणाम स्पष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय, सामाजिक चळवळींचा अभ्यास हा भारतीय लोकशाहीच्या जिवंतपणाचा पुरावा आहे. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला आणि आणि विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांनी आपले हक्क कसे मांडले आणि राज्यव्यवस्थेवर कसा प्रभाव टाकला, याचे विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. संकल्पनांची स्पष्टता, मुद्देसूद मांडणी आणि समकालीन उदाहरणांचा वापर यामुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916724859109,"sku":"9789377761011","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyRajkaran_wanarse-1.jpg?v=1789983658","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}