{"product_id":"भारतीय-राजकीय-व्यवस्थेतील-अलीकडील-प्रवाह","title":"भारतीय राजकीय व्यवस्थेतील अलीकडील प्रवाह","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाह’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राजकारणात सध्या अनेक महत्त्वाचे प्रवाह कार्यरत आहेत, जे देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम करत आहेत. यामध्ये आरक्षण, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षा तसेच भारतातील राजकीय नेतृत्व यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. या प्रवाहांचा अभ्यास करणे हे समकालीन भारतीय राजकारणाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. हे पुस्तक म्हणजे भारतीय राजकारणाच्या गुंतागुंतीच्या प्रवाहांना समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाहाचा परिचय आणि\u003cbr\u003eस्वरूप, मिडिया आणि नागरी समाजाची भूमिका, लोकशाही संस्थांसमोरील आव्हाने राजकीय सुधारणा आणि निवडणूक नवकल्पना, भारतातील आरक्षणाचे राजकारण, आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूी, आरक्षणाच्या संविधानातील तरतुदी, मंडल आयोग आणि परिणाम, आरक्षणाचे सध्याचे वादविवाद, राष्ट्रवादाची संकल्पना,\u003cbr\u003eभारतीय राष्ट्रवादाचा विकास, राष्ट्रवादाचे प्रकार, राष्ट्रवादाचा धोरणनिर्मिती आणि राष्ट्रीय ओळखीवर परिणाम, सांप्रदायिकतेची संकल्पना आणि सांप्रदायिकतेची कारणे, सांप्रदायिक दंगली व त्यांचा राजकीय परिणाम, सांप्रदायिकतेबाबत राज्य आणि राजकीय पक्षांची भूमिका, दहशतवादाचा अर्थ आणि भारतातील प्रकार,\u003cbr\u003eभारतातील दहशतवादाची कारणे, दहशतवादाचा संघराज्यवादावर आणि मानवी हक्कांवर प्रभाव, दहशतवाद विरोधी कायदे : णअझअ, छखअ अधिनियम, भारतातील राजकीय नेतृत्व, नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्वाचे प्रकार, युवक आणि महिला नेतृत्वाची भूमिका, संकट व्यवस्थापन आणि नेतृत्वाची सार्वजनिक प्रतिमा इत्यादी\u003cbr\u003eघटकांचे सविस्तर व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617242558693,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyRajkiyVyavsthetilAlikadilPravah1-1.jpg?v=1774605450","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}