{"product_id":"भारतीय-लष्करी-इतिहास-भाग-2","title":"भारतीय लष्करी इतिहास (भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003eमुघल आक्रमक बाबरने तोफांचा वापर केल्याने त्याला भारतात विजय मिळवून मुघल साम्राज्य स्थापन करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मुघल व आदिलशहा यांना आव्हान मिळाले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत आधुनिक युद्धतंत्राचा उपयोग करण्याचा मराठ्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. एकोणिसाव्या शतकात महाराजा रणजीतसिग यांनी शिख सेनेच्या रूपाने ब्रिटिशांसमोर मोठे आव्हान उभे केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात स्थापन केलेले सैन्य हे आजच्या आधुनिक सेनादलांचे प्रारंभिक स्वरूप मानावे लागेल. भारतात आलेल्या एका व्यापारी कंपनीने ऐतदेशीय लोकांचेच सैन्य स्थापन केले. या सैनिकांनीच इंग्रजांना हा देश जिंकून दिला… म्हणूनच विद्यार्थ्यांनी भारताचा लष्करी इतिहासाचे अध्ययन केल्याने ते राष्ट्रीय संरक्षणाबद्दल जागरूक होतील. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. भारतीय लोकांनी दीर्घकाळ सीमांच्या संरक्षणाकडे व एकूणच देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिणामी त्यांना परकीयांची गुलामगिरी करावी लागली. त्यामुळे त्यांना देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांची जाणीव करून देणे आवश्यक ठरते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470556803301,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Lashkari-Itihas_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772004147","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}