{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-इ-स-1857-ते-इ-स-1950","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स.1857 ते इ.स.1950)","description":"\u003cp\u003eभारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशाप्रसंगी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा वेध घेणे आवश्यक ठरते. इ.स.1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीचे युद्ध करून बंगालमध्ये प्रथमच कंपनीची सत्ता स्थापन केली. बक्सारच्या युद्धाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होवून तिने ब्रिटीशाविरूद्ध सनदशीर मार्गाने चळवळ सुरू केली. 1905 पर्यंत हे ठीक होते. पण त्यानंतर जहाल मतवाद भारतात निर्माण झाला. चतुःसूत्रीचा स्वीकार करावा असा गजर जहालवाद्यांनी सुरू केला. त्यातून सुरत येथे काँग्रेस फुटली. 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल एकत्र आले. 1920 मध्ये म.गांधीजी युगाला प्रारंभ झाला. अहिंसा, सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. असहकार, कायदेभंगाचे युग अवतरले. अनेकांना फासावर लटकावले. कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. म.गांधीजींना तो मार्ग पसंत नव्हता. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध चालु असतांना म.गांधीजी यांनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली तर तिकडे जपानचे सहाय्य घेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून जय हिंदची घोषणा केली. अशा अनेक घटना हिंदुस्थानात घडल्या. त्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची कहानी म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477457645797,"sku":null,"price":365.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Swatantrya-Chalvalicha-Itihas-AD-1857-1950_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772176630","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%87-%e0%a4%b8-1857-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87-%e0%a4%b8-1950","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}