{"product_id":"भूरूपशास्त्राची-मूलतत्त्वे-principle-of-geomorphology","title":"भूरूपशास्त्राची  मूलतत्त्वे  Principle Of Geomorphology","description":"\u003cp\u003e‘भूरूपशास्राची मूलतत्त्वे’ हे क्रमिक पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. भाग-1 च्या विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. हे पुस्तक नवीन राष्ट्रीय धोरणाच्या उद्देशानुसार लिहिले आहे. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकांच्या हाती देताना आनंद होत आहे. विद्यार्थी व शिक्षक वर्ग या पुस्तकाचे निश्चित स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.\u003cbr\u003eभूरूपशास्र भूगोलाची मुख्य शाखा आहे. भूरूपशास्राचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययन-अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असतात. भूरूपशास्राच्या संकल्पना समजल्यावर भूगोलशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने पाठ्यांशाची मांडणी केली आहे.\u003cbr\u003eसदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेली आहे. त्यात भूरूपशास्राची सामान्य संकल्पना, विदारण, नदी, वारा आणि हिमनदी या कारकांचे भूरूपीय कार्य या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.\u003cbr\u003eभूरूपशास्राचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 74 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48630984704229,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhurupshastrachiMultattve_DrShankarRChaudhari-1.jpg?v=1774939164","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-principle-of-geomorphology","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}