{"product_id":"मध्ययुगीन-भारत-इ-स-1206-ते-इ-स-1707-medieval-india-1206-a-d-to-1707-a-d","title":"मध्ययुगीन भारत (इ.स. 1206 ते इ.स. 1707) (Medieval India (1206 A.D. to 1707 A.D.))","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टी.वाय.बी.ए. सत्र-5 व सत्र-6 साठी विद्यार्थी व प्राध्यापकांपुढे हे पुस्तक सादर करतांना अतिशय आनंद होत आहे.\u003cbr\u003eमध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. दिल्ली सुलतानशाहीत पाच घराणे होऊन गेले. पहिले गुलाम घराणे यात कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रझिया, बल्बन हे प्रभावी होऊन गेले. दुसरे खिलजी घराणे यात अल्लाउद्दीन खिलजी श्रेष्ठ होता. तिसरे तुघलक घराणे यात गियासउद्दीन तुघलक, महमद तुघलक, फिरोज तुघलक हे सुलतान होऊन गेले. चौथे सय्यद घराणे यात खिज्रखान सय्यद सोडला तर बाकी सुलतान कुचकामी होते. शेवटचे पाचवे घराणे लोदी घराणे यात बहलोल लोदी, सिकंदर लोदी, इब्राहीम लोदी होऊन गेले. इब्राहीम लोदी दिल्ली सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान होय. 21 एप्रिल 1526 च्या पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली. \u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67749590139109,"sku":"9789389501971","price":370.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MadhyayuginBharat_1206A.D.-1707A.D.__Devkate-1.jpg?v=1792409941","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%87-%e0%a4%b8-1206-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87-%e0%a4%b8-1707-medieval-india-1206-a-d-to-1707-a-d","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}