{"product_id":"मध्ययुगीन-मराठी-वाङ्मयाचा-स्थूल-इतिहास","title":"मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालखंड प्रारंभापासून ते मराठी सत्तेच्या अखेरपर्यंत आहे. या सहा-साडेसहा शतकांमध्ये सुरुवातीला तेराव्या शतकात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. नंतर बहामनी सत्ता, शिवकाळ, पेशवाई अशा सत्ता बदलत गेल्या. या सत्तांबरोबरच तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक वातावरण बदलत गेले. या बदलांचे प्रतिबिंब त्या-त्या काळच्या वाङ्मयात पडले. यादवकाळ, बहामनीकाळ, शिवकाळ व पेशवेकाळ या राजकीय कालखंडांची सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी येथे विस्ताराने सांगितली आहे. या चारही कालखंडातील महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय व इतर संप्रदायातील वाङ्मय व महत्त्वाचे ग्रंथकार यांचा येथे निर्देश केलेला आहे. त्याचप्रमाणे पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय, बखर वाङ्मय व गद्य वाङ्मय या मध्ययुगीन वाङ्मयप्रवाहांचीही सविस्तर चर्चा केली आहे. ग्रंथकारांच्या चरित्राचा धावता आढावा घेऊन साहित्यकृतींच्या विवेचनाला महत्त्व दिले आहे. यादृष्टीने हे लेखन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eMadhyayugin Marathi Vadmayacha Sthul Itihas\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470889169125,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-Marathi-Vangmayacha-Itihas_Atul-Deshmukh_cnvt-1-1.jpg?v=1772019561","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%99%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%82%e0%a4%b2-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}