{"product_id":"मराठीचा-भाषिक-अभ्यास","title":"मराठीचा भाषिक अभ्यास","description":"\u003cp\u003eइ.स.दहावे शतकात यादव काळात मराठी भाषा-संस्कृतीची जडण-घडण झाली. यादव काळातील या मराठी भाषेचा ‘अमृतातेहि पैजा जिंके’ अशा शब्दात गौरव केला जातो. मराठीचे हे वैभव कालिक, राजकीय स्थित्यंतरांनी नष्ट झाले. बहामनीकाळात मुस्लिम राजवट व त्यांची ‘उर्दू-फारसीमिश्रित हिन्दी’ या भाषासंपर्कामुळे मराठी भाषा भ्रष्ट झाली. शिवकाळात तीने आपले पूर्वरुप प्राप्त केले. पेशवेकाळ व आंग्लकाळातील अन्यभाषिकांच्या संपर्कात तिचे स्वरूप बदलत गेले. आजच्या मराठी प्रमाणभाषेचा या स्थित्यंतराशी संबंध आहे.\u003cbr\u003eमराठी भाषेची पूर्वपीठिका, उत्पत्ती कालखंड, निश्चितीची साधने, त्यासंदर्भातील वैद्य-गुणे वाद, भाषा उत्पत्तीचे सिद्धान्त व भाषाकुल संकल्पना, मराठी भाषेवर झालेला अन्य भाषा परिणाम, प्रमाणभाषा व बोलीभाषा सहसंबंध, मराठीचे शब्दभांडार, मराठीचे कालिक भेद व प्रान्तिक भेद, भाषा आणि लिपी इ. घटकांचा संबंध ‘मराठीचा भाषिक अभ्यास’ या अभ्यासक्षेत्राशी निगडीत आहे. एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. स्पर्धात्मक परीक्षेत त्यांचा समावेश आहे. म्हणूनच विद्यापीठीय मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातो. प्रस्तुत पुस्तकात या विषय घटकांच्या संदर्भात मान्यवर अभ्यासकांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेतला आहे. नव्या पिढीतील मराठी अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना व भाषाभ्यासकांना अभ्यासपूर्ण विवेचनासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. डॉ. प्रभाकर जोशी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453427101925,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathicha-Bhashik-Abhyas-Prabhakar-Joshi_cnvt-1.jpg?v=1771652312","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}