{"product_id":"मराठी-भाषा-आणि-भाषाविज्ञान","title":"मराठी भाषा आणि भाषाविज्ञान","description":"\u003cp\u003e पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात भाषाविज्ञान हा विषय आज प्राधान्याने शिकविला जातो आहे. प्रारंभी नवीन असणारा हा विषय आता कोणत्याही भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अपरिहार्य झालेला आहे. वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा पाया घालणाऱ्या फेर्दिनां द स्योसुर या भाषाअभ्यासकापासून आजपावेतो भाषाविज्ञानाने अनेक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला दिसतो. संगणक विज्ञान, भाषा नियोजन, कोष विज्ञान आदिसारख्या संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या या विषयाचे स्वरूप आज आंतर-अभ्यासक्षेत्रीय झालेले आहे. सर्वच भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणारा हा विषय असल्याने आज तो आवश्यक ठरलेला आहे. सदर पुस्तकात भाषेची उत्पत्ती, भाषेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि कार्य, स्वनिम व रूपिम विचार, वाक्यविचार, मराठीची वर्णमाला, मराठीचे ध्वनीपरिवर्तन, मराठीचे अर्थपरिवर्तन, प्रमाण मराठी भाषा आणि बोली या घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या व शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे भाषाविज्ञान सुलभ पद्धतीने शिकता यावे, यादृष्टीने या पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479749701861,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Bhasha-Aani-Bhashavidnyan_Dr-Chandrakantt-Kadam_cnvt-1.jpg?v=1772262494","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}