{"product_id":"मराठी-वाङ्मयातील-नियतकालिकांचे-साहित्य-प्रवाहातील-योगदान","title":"मराठी वाङ्मयातील नियतकालिकांचे साहित्य प्रवाहातील योगदान","description":"\u003cp\u003eकालांतराने निखळ वाङ्मयीन हेतूने सुरू झालेल्या नियतकालिकांनी मराठी साहित्याचे क्षितिज विस्तारीत केले. या नियतकालिकांनी मराठी साहित्य विचाराची आणि साहित्यसमीक्षेची पायाभरणी केली. सत्यकथासारख्या नियतकालिकाने या वाङ्मय प्रवाहाला अनेक वाटा आणि वळणे दिली. नवसाहित्याचा प्रवाह यामुळे विस्तारत गेला. अस्मितादर्शसारखे नियतकालिक तर प्रस्थापित मुखवटे फाडत आंबेडकरी विचारांचा उद्घोष करीत निघाले. मधल्या काळात अनियतकालिकाची चळवळ देखील सुरू झाली. 1990 नंतर मात्र सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींना कवेत घेऊन वाङ्मयीन चळवळ जागविणारी नियतकालिके हळूहळू बंद पडत गेली. अपवादाने नव-अनुष्ठुभ, प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्यपत्रिका, कविता-रती, भाषा आणि जीवन ही नियतकालिके आपली गुणवत्ता जोपासत. निर्माण केलेला मानदंड चिवटपणे जोपासत सुरू आहेत. या सर्व परिस्थितीत धर्माबाद सारख्या दुरच्या टोकावरील गावातून ‘भूमी’ची मशागत करणारा कवी श्रीराम गव्हाणे किंवा कन्नड मधून पदरमोड करीत ‘तिफण’ चालविणारा शिवाजी हुसे किंवा पुण्यासारख्या ठिकाणी प्रबळ जिद्दीतून ‘सक्षमसमीक्षा’ चालविणारा शैलेश त्रिभुवन तसेच मराठवाड्यातून अक्षर वाङ्मय आणि अक्षर गाथा चालविणारे मा.मा. जाधव तसेच नाना सुर्यवंशी ही मंडळी नव्याने नियतकालिकांची चळवळ उभी करीत आहे. मात्र आर्थिक अडचणीमूळे वर्गणीदारांच्या आवश्यकतेतून सुमारलेखनाला देखील सभासदत्त्वामुळे प्रसिद्धी द्यावी लागते. या साऱ्या आव्हानांना तोंड देत मराठी नियतकालिके सुरू आहे. त्यामुळे परत एकदा या नियतकालिकांच्या स्थितीगतीचा, दशा आणि दिशेचा वेध घेणे ही आजच्या वाङ्मयीन काळाची गरज आहे. मला विश्वास आहे की, हा संदर्भग्रंथ निश्चीतच अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना, वाचकांना आवडेल. कारण मराठीत या विषयावर परिपूर्ण असा संदर्भग्रंथ नाही. मात्र या पुस्तकातून ही अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण होईल.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48875796529381,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MarathiVadmayaPrakaraniSaidhantikRachnavAdhyapanPadhati_Chandwadkar-1.jpg?v=1776765556","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%99%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}