{"product_id":"महाराष्ट्राचे-शासन-government-of-maharashtra","title":"महाराष्ट्राचे शासन (Government of Maharashtra)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या TYBA च्या NEP च्या अभ्यासक्रमा-नुसार “महाराष्ट्राचे शासन” या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. याचे विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. संकल्पनांची स्पष्टता, मुद्देसूद मांडणी आणि समकालीन उदाहरणांचा वापर यामुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र हे समृद्ध इतिहास, संघर्षमय जनआंदोलन, प्रगल्भ राजकीय जाणीव आणि सक्षम प्रशासनपरंपरेचे प्रतीक असलेले राज्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्राचा इतिहास, भाषिक अस्मितेच्या आधारावर उभे राहिलेले संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, द्विभाषिक मुंबई राज्याचा टप्पा आणि अखेर 1 मे 1960 रोजी झालेली महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही सर्वच प्रक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीला आकार देणारी ठरली.\u003cbr\u003e या ग्रंथामध्ये महाराष्ट्राच्या शासनव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेताना महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी (स्वातंत्र्यपूर्व काळ) संयुक्त महाराष्ट्र चळवळ (1947 ते 1955) द्विभाषिक मुंबई राज्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळ (1956 ते 1960) आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती राज्यपाल, महाराष्ट्राचे विधानमंडळ, मुख्यमंत्री व मंत्रीपरिषद, तसेच उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांच्या भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. शासनव्यवस्थेचे हे घटक केवळ राज्यकारभार चालविणारी यंत्रणा नसून, ते लोकशाही, उत्तरदायित्व आणि प्रशासनिक समतोल यांचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थी, संशोधक आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासक यांना महाराष्ट्राच्या राजकीय व प्रशासकीय रचनेचे स्पष्ट, सुबोध आणि क्रमबद्ध आकलन व्हावे, हा या पुस्तकामागील प्रमुख हेतू आहे. विषयाची मांडणी सुलभ, तथ्याधारित आणि अभ्यासोपयोगी ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून वाचकांना इतिहासापासून शासनरचनेपर्यंतचा प्रवास एकसंधपणे समजावा. महाराष्ट्राच्या घडामोडींचा अभ्यास करताना केवळ घटनांची माहिती पुरेशी नसते; त्या घटनांमागील विचार, संघर्ष, नेतृत्वाची भूमिका समजून घेणेही महत्त्वाचे असते. म्हणूनच या पुस्तकात ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून शासनरचनेपर्यंतची मांडणी महाराष्ट्राच्या राजकीय विकासाचा सखोल परिचय करून देण्यासाठी केली आहे. हे पुस्तक तयार करताना विश्वसनीय संदर्भांचा आधार घेऊन वस्तुनिष्ठ आणि संतुलित विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचा इतिहास आणि शासनव्यवस्था समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचकांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52907045388517,"sku":"9789377761066","price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MaharashtracheShasan_wanarase-1.jpg?v=1789820473","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-government-of-maharashtra","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}