{"product_id":"माती","title":"माती","description":"\u003cp\u003eजीवनात आईचे स्थान महत्वाचे आहे. ती दूध पाजून मोठे करते. संस्कार करते. तिचे ॠण फिटू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माती हीसुध्दा आईच्याच स्थानी आहे. शेतीत राबताना अनेक अनुभव आलेत. तिच्या कुशीत वाढलेली विविध पिके पाहून काव्य सुचले. कष्ट करताना अनुभव आलेत तेच या ठिकाणी मांडलेत. तिच्यामधून जे अन्नधान्य पिकले त्यावर शरीर, मन पोसले गेले. मातीने कवीला समृध्द केले. शेतीविषयी लळा लावला. जीवनाचा अंतही मातीतच होणार आहे. तिच्या कुशीतच विसावा मिळणार आहे. म्हणून तिच्याविषयीची कृतज्ञता मानून काव्यसंग्रहास ‘माती’ हे नाव दिले.\u003cbr\u003eबालपणापासून शेतकरी कुटूंबात येणारे अनुभव पाठीशी होते. तेच सगळे विचार काव्यातून व्यक्त केलेले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या व्यथा, दु:ख, ग्रामीण जीवन, ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती अतिशय सुंदर शब्दात येथे व्यक्त झाली आहे. कविवर्य ना.धों. महानोरांच्या शब्दांत –\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्यं येती अशी फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eMati Kavyasangrah\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470567911653,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mati-Kavyasangrah_cnvt-1.jpg?v=1772004468","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}